शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी, आता वर्षाला मिळणार 12 हजार, या 5 योजना माहितीये का?

Last Updated:
केंद्र आणि राज्य सरकारकडून शेती व शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. यातील 5 प्रमुख योजना सर्व शेतकऱ्यांना माहिती असाव्यात.
1/5
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. या माध्यमातून शेती आणि शेतकऱ्यांचा विकास व्हावा हा उद्देश असतो. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुधारणा व्हावी हाच शासकीय योजना राबवण्याचा हेतू असतो. शेतकरी हितासाठी राबविल्या जाणाऱ्या 5 प्रमुख योजनांबाबत जाणून घेऊ.
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. या माध्यमातून आणि शेतकऱ्यांचा विकास व्हावा हा उद्देश असतो. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुधारणा व्हावी हाच शासकीय योजना राबवण्याचा हेतू असतो. शेतकरी हितासाठी राबविल्या जाणाऱ्या 5 प्रमुख योजनांबाबत जाणून घेऊ.
advertisement
2/5
किसान क्रेडिट कार्ड योजना - एखादं पीक उभं करायचं म्हंटलं की, शेतकऱ्याला पहिल्यांदा आर्थिक मदतीची गरज भासते. शेतीच्या मशागतीपासून पीक काढणीला येईपर्यंत मोठ्याप्रमाणात खर्च होतो. याच गोष्टीचा विचार करून केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केलीये. या योजनेतून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध होते.

3/5
नमो शेतकरी महासन्मान योजना - ही योजना शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत सर्वात जास्त फायदेशीर ठरली आहे. केंद्र सरकार या योजनेंतर्गत वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना करत आहे. त्यात आता राज्य सरकारची 6000 हजारांची भर पडली असून शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 12000 रूपये मिळणार आहेत.

4/5
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना - स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून एखाद्या शेतकऱ्याचा अपघात झाला तर त्याच्या कुटुंबाला प्रत्येकी 2 लाखांचे अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेंतर्गत रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतूनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरुन पडून झालेला अपघात, जनावरांचा हल्ला या अपघातांचा समावेश आहे.

5/5
कृषी उत्पादनाच्या सागरी मार्गाने निर्यातीसाठी अनुदान योजना: आपला शेतीमाल हा परदेशात विकला जावा तसेच चांगला मोबदला मिळावा अशी प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते. आता ही इच्छा पूर्ण करण्यासाठी सरकारने सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना राबवली आहे. या योजनेत, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक गट/कंपनी, संस्था, निर्यातदार किंवा शेतकरी या पैकी जे कोणी निर्दिष्ट कृषी उत्पादनाची निर्यात करेल, ते रू. 50 हजार प्रति कंटेनर ( 20 फूट/40 फूट) इतक्या अनुदानास पात्र असणार आहेत. त्यासाठी प्रति लाभार्थी व्यक्तीला कमाल वार्षिक अनुदान 1 लाख रुपये इतके असणार आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement