द्राक्ष बागायतदार शेतकरी वळला सीताफळ शेतीकडे, आता वर्षाला 12 लाखांची कमाई
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
कोरोना लॉकडाऊनमध्ये झालेला घाटा भरून काढण्यासाठी ते सीताफळ शेतीकडे वळले आणि त्यातून त्यांची आर्थिक भरभराट झाली आहे. मागील वर्षी सीताफळ शेतीतून त्यांना तब्बल 12 लाखांचे उत्पन्न झाले तर यंदा 15 लाखांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे.
advertisement
advertisement
advertisement
कोरोना काळामध्ये अनेक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. क्षीरसागर हे सुद्धा त्या शेतकऱ्यांपैकी एक आहेत. द्राक्ष उत्पादक म्हणून परिसरात ख्याती असलेल्या क्षीरसागर यांना मोठे नुकसान सहन करावे लागल्याने दुसरे काहीतरी उत्पन्नाचे साधन असलेले पीक घ्यावे, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यानंतर मित्रांच्या मार्गदर्शनाने त्यांनी बळीराजा गोल्डन नावाच्या सिताफळ वाणाची आपल्या शेतामध्ये 15 बाय 6 या अंतरावर लागवड केली.
advertisement
advertisement
advertisement
गुणवत्ता उत्तम असेल तर बाजारात दरही उत्तम मिळतो, याचा मला अनुभव आहे. यामुळेच फळांची गुणवत्ता राखण्यासाठी फळांना फ्रुट प्रोटेक्शन बॅग बसवल्या आहेत. त्याचबरोबर एका फार्म प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून या सिताफळला दुबईत निर्यात करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. या सीताफळच्या प्लॉटला पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने विकसित केले आहे. यामुळे फळांची गुणवत्ता उत्तम राहत असून 148 रुपये प्रति किलोपर्यंत दर आपल्या सीताफळांना मिळाला आहे. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक बाजू भक्कम करणारे पीक म्हणून हे पीक पुढे येत असल्याचे कृष्णा शिरसागर यांनी सांगितले.










