फक्त 6 हजारांचा खर्च, 20 वर्षांपासून मोफत गॅस, शेतकऱ्यानं कशी लढवली शक्कल?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Farmer Innovation: घरगुती सिलेंडरचे दर पाहता वर्षाला शेतकरी नागेश ननवरे यांची 12 हजार रुपये पर्यंत बचत होत आहे.
advertisement
advertisement
बीबी दारफळ येथील शेतकरी नागेश ननवरे 20 वर्षापासून घरात गोबर गॅस वापरत आहेत. दररोज 3 वेळच्याचा स्वयंपाक या गोबर गॅसपासून मिळणाऱ्या इंधनावर होत आहे. घरगुती सिलेंडरचे दर पाहता वर्षाला शेतकरी नागेश ननवरे यांची 12 हजार रुपये पर्यंत बचत होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या दारात जनावरे आहेत, त्यांनी शेणापासून गोबर गॅसची निर्मिती करून त्याचा वापर करावा.
advertisement
advertisement
नागेश ननवरे हे आधी जुन्या पद्धतीने गोबर गॅस निर्मिती करत होते. 3 वर्षांपूर्वी नागेश यांनी आधुनिक पद्धतीचे शेणापासून तयार होणाऱ्या गोबर गॅसच्या युनिटची निर्मिती केली आहे. आधुनिक पद्धतीने युनिट तयार करण्यासाठी कमीत कमी 6 हजार रुपयापर्यंतचा खर्च येतो. 6 बाय 6 आणि खोली 4 फूट या पद्धतीने हा गोबर गॅस युनिट तयार करण्यात आला आहे. तसेच हा युनिट 10 वर्षांपर्यंत सुस्थितीत राहतो, असं ननवरे सांगतात.
advertisement
advertisement