नोकरी सोडून केली पचौली वनस्पतीची लागवड, वर्षाकाठी एकरी 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा
- Reported by:Sitraj Ramesh Parab
- Published by:Mohan Najan
Last Updated:
वैभव परबने पचौली या झुडुपवर्गीय वनस्पतीची लागवड केली आहे. यामधून त्याला लाखोंची कमाई होत आहे.
advertisement
वैभव प्रभाकर परब या 28 वर्षीय तरुणाचा जन्म मुंबईचा. इथंच बी.कॉमपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून त्यानं एका खासगी कंपनीत नोकरी करायला सुरूवात केली. यावेळी त्याचे सहकारी परांजपे यांनी त्याला परफ्यूमसाठी कच्चामाल असलेल्या पचौली वनस्पतीची लागवड कोकणात होऊ शकते, असा सल्ला दिला. मग काय, वैभवच्या डोक्यात हळूहळू त्याची शेती पिकू लागली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कोकणात नारळ बागेत डोंगर उतारावर या सुगंधी वनस्पतीची लागवड शक्य असल्याचं शेतीतज्ज्ञ सांगतात. जिथं पूर्वी भात किंवा ऊस शेती होत होती अशा शेतात पचौली लागवडीचा यशस्वी प्रयोग वैभवनं केला आहे. यासाठी सुरुवातीला जमिनीची साफसफाई आणि मशागत करण्यासाठी सुमारे 1 लाख रुपये खर्च आला. आज त्यानं साडेचार एकर जमिनीवर पचौली वनस्पतीची लागवड केली आहे.
advertisement
वैभवला या व्यवसायातून आज पूर्ण खर्च वगळून वर्षाकाठी एकरी अडीच ते 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा होतो. मुंबईतली चांगल्या पगाराची नोकरी सोडून गावाकडे जाऊन शेती करणं, हा निर्णय काही सोपा नव्हता, मात्र वैभवनं आपल्या नावाप्रमाणेच शिवारात वैभव पिकवलं, आज त्यातून तो सुखा-समाधानाचं आयुष्य जगतोय. अनेक तरुणांसाठी तो आदर्श ठरला आहे. शेवटी काय, पगारासाठी काम सगळेच करतात, मात्र पॅशन म्हणून काम करण्याची मजा काही औरच असते आणि त्याचं फळही तसंच मिळतं.









