advertisement

इराण अमेरिकेची जिरवणार, थेट मुळावर घाव घालण्याचा प्लॅन, डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं

Last Updated:

मध्यपूर्वेतील संघर्षात इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाने जगाला विळखा घातला आहे. अमेरिकेच्या सहा सैनिकांचा मृत्यू झाला. इराणने 'डिमोना' अणुऊर्जा केंद्रावर हल्ल्याचा इशारा दिला आहे.

Donald Trump
Donald Trump
मध्यपूर्वेतील संघर्षाचा वणवा आता केवळ सीमेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण जगाच्या अस्तित्वाला विळखा घालू लागला आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील हे युद्ध आता अशा वळणावर पोहोचलं आहे, जिथून परतण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही.
इराणची राजधानी तेहरानसह लेबनॉनमधील बेरुतमध्ये सध्या फक्त धुराचे लोट आणि रक्ताचा सडा पाहायला मिळतोय. या भीषण संघर्षात आतापर्यंत १,०४५ हून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, मृत्यूचा हा आकडा दर मिनिटाला वाढत आहे.
हे युद्ध आता केवळ जमिनीवरची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेच्या मुळावर उठली आहे. या युद्धाची सर्वात मोठी झळ आता थेट अमेरिकेलाही बसली आहे. कुवेतच्या समुद्रामध्ये एका तेल टँकरमध्ये भीषण स्फोट झाला आणि या संघर्षात अमेरिकेच्या सहा सैनिकांना आपला जीव गमवावा लागला. अमेरिकेने मेजर जेफरी ओ'ब्रायन आणि रॉबर्ट मार्झन या आपल्या शूर जवानांची नावे जाहीर करताच जगभरात खळबळ उडाली आहे.
advertisement
दुसरीकडे, अमेरिकन सिनेटमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लष्करी धोरणाला मोठं बळ मिळालं आहे. ट्रम्प यांना रोखण्यासाठी आणलेला प्रस्ताव फेटाळला गेल्याने, आता अमेरिकन लष्कर इराणवर आणखी भीषण हल्ले करण्याच्या तयारीत आहे. ट्रम्प यांचा हा आक्रमक पवित्रा मध्यपूर्वेला पूर्णपणे उद्ध्वस्त करेल की काय, अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे.
युद्धाच्या या रणधुमाळीत इराणने आता जगाला धडकी भरवणारा इशारा दिला. जर अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील सत्ता उलथवून लावण्याचा प्रयत्न केला, तर इस्रायलचं 'डिमोना' हे अणुऊर्जा केंद्र आमचं टार्गेट असेल, असं इराणने स्पष्ट केलंय. अणू केंद्रावर हल्ला होणं म्हणजे संपूर्ण जगासाठी विनाशकारी ठरू शकतं. हा केवळ इशारा नाही, तर विनाशाची नांदी मानली जात आहे. दरम्यान, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली 'होर्मुजची सामुद्रधुनी' बंद करण्याची तयारी सुरू केली आहे.
advertisement
जगाचा मोठा तेल पुरवठा याच मार्गावरून होतो. जर हा मार्ग बंद झाला, तर जगात इंधनाचा हाहाकार माजेल आणि प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेला खिळ बसेल. या जागतिक तणावाचा फटका आता सर्वसामान्य प्रवाशांना आणि भारतीयांनाही बसू लागला आहे. मध्यपूर्वेतील एअरस्पेसवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे बंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळावर तब्बल ३४ आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत.
advertisement
दुबई, दोहा, रियाध आणि जेद्दाहला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. कतारमधील भारतीय दूतावासानं तिथल्या भारतीयांसाठी 'अ‍ॅडव्हायजरी' जारी करत त्यांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. हजारो परदेशी नागरिक सध्या या युद्धभूमीतून सुखरूप बाहेर पडण्यासाठी एअरलिफ्टची वाट पाहत आहेत. न्यूझीलंड आणि कॅनडासारख्या देशांनी आपली लष्करी विमानं सज्ज ठेवली आहेत.
हे युद्ध आता केवळ दोन-तीन देशांपुरतं उरलेलं नाही, तर ते तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. अमेरिका समुद्र, जमीन आणि आकाश तिन्ही ठिकाणहून हल्ले करत आहे. प्रत्यक्षात रशिया आणि चीन या युद्धात अजून उतरले नाहीत मात्र हे असंच सुरू राहील तर कदाचित तेही लांब नसेल ही भीती संपूर्ण जगाला वाटत आहे. याच भीतीमुळे शेअर मार्केटही कोसळत आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
इराण अमेरिकेची जिरवणार, थेट मुळावर घाव घालण्याचा प्लॅन, डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement