गावाकडे शेतात घर बांधत असाल तर सावधान! थेट बुलडोझर कारवाई होणार, नियम काय सांगतो?

Last Updated:
Agriculture News : ग्रामीण भागात शेतात घर असावं ही अनेकांची जुनी इच्छा असते. घराच्या अंगणातून संपूर्ण शेत दिसावं, शेतीचं रक्षण व्हावं आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहता यावं, यासाठी अनेक शेतकरी शेतजमिनीवर घर बांधण्याचा विचार करतात.
1/5
agriculture news
मुंबई : ग्रामीण भागात शेतात घर असावं ही अनेकांची जुनी इच्छा असते. घराच्या अंगणातून संपूर्ण शेत दिसावं, शेतीचं रक्षण व्हावं आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहता यावं, यासाठी अनेक शेतकरी शेतजमिनीवर घर बांधण्याचा विचार करतात. मात्र, हे इतकं सोपं नाही. कायदेशीरदृष्ट्या शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी ठराविक नियम आहेत. त्यामुळे अशा निर्णयापूर्वी नियम व प्रक्रिया समजून घेणे अत्यावश्यक आहे.
advertisement
2/5
शेतजमिनीवर घर बांधता येतं का?
शेतजमिनीवर घर बांधता येतं का? मुळात कृषी जमीन ही फक्त शेतीसाठी वापरण्याची परवानगी असते. त्यामुळे अशा जमिनीवर थेट घर बांधता येत नाही. जर शेतकरी परवानगीशिवाय घर बांधतात, तर बांधकाम पाडण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे अशा जमिनीवर घर किंवा कोणताही व्यवसाय उभारण्यासाठी प्रथम ती जमीन अकृषिक (Non-Agriculture – NA) घोषित करावी लागते.
advertisement
3/5
जमीन NA करण्याची गरज का?
जमीन NA करण्याची गरज का? शेतजमिनीचे नॉन अॅग्रिकल्चरमध्ये रूपांतर केल्यानंतरच त्या जमिनीवर निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक बांधकाम करता येते. यासाठी शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे.
advertisement
4/5
शेतात घर बांधण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
शेतात घर बांधण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -  जमीन NA करण्यासाठी व घर बांधण्याच्या परवानगीसाठी खालील कागदपत्रे लागतात. जसे की, जमीन मालकाचे ओळखपत्र, सातबारा व ८अ उतारा, भाडेकरू किंवा सहमालकांची नोंद (असल्यास), सर्वेक्षण नकाशा, महसूल पावती, जमीन थकबाकी नसल्याचा दाखला, न्यायालयीन वाद नसल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत/नगरपरिषद परवानगी जमीन NA झाल्यानंतर ग्रामपंचायत किंवा नगरपरिषदेकडून घर बांधकामासाठी एनओसी (NOC) घेणे आवश्यक आहे. यात घराच्या नकाशाला मान्यता देणे, बांधकामाचे नियोजन तपासणे, तसेच सार्वजनिक सोयीसुविधांचा विचार केला जातो.
advertisement
5/5
महत्त्वाची सूचना
महत्त्वाची सूचना -  परवानगीशिवाय शेतजमिनीवर घर बांधल्यास बांधकाम पाडले जाऊ शकते. जमीन NA करताना सर्व कागदपत्रे पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. जमिनीवर कोणतेही बोजे किंवा न्यायालयीन वाद नसणे महत्त्वाचे आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
View All
advertisement