तब्बल 18 महिन्यांनी प्रतीक्षा संपणार! 23 सप्टेंबरपासून या राशींच्या लोकांनी फक्त नोटा मोजायच्या
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींना विशेष महत्त्व दिले जाते. प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर राशी आणि नक्षत्र बदलतो आणि त्याचा थेट परिणाम मानवाच्या जीवनावर होतो.
advertisement
advertisement
कुंभ - कुंभ राशीसाठी मंगळ ग्रहाचे हे नक्षत्र परिवर्तन अतिशय शुभ मानले जात आहे. या काळात तुम्हाला नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याची उत्तम संधी मिळेल. नोकरदार वर्गाला मान-सन्मान मिळेल, तसेच कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबतचे संबंध दृढ होतील. तुमच्या साहस, पराक्रम आणि आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. घरगुती पातळीवर संपत्तीशी संबंधित जुने वाद संपुष्टात येतील. भावंडांशी असलेले नाते अधिक घट्ट होऊन घरात सौहार्दाचे वातावरण निर्माण होईल.
advertisement
कर्क - कर्क राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे संक्रमण अत्यंत लाभदायी ठरणार आहे. लक्ष्मीमातेची कृपा तुमच्यावर राहील आणि पैशांची आवक वाढेल. या काळात तुम्हाला योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते. व्यावसायिक दृष्ट्या प्रगती होईल आणि नवीन लोकांशी उपयुक्त ओळखी निर्माण होतील. कुटुंबात आनंद, शांतता आणि समृद्धी राहील. सरकारी योजनांचा लाभ घेण्याच्या अनेक संधी मिळतील. आर्थिक स्थैर्याबरोबरच सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल.
advertisement
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचं हे संक्रमण प्रगती आणि यशाचं दार उघडणार आहे. व्यवसायात मोठ्या प्रमाणावर विस्तार होईल. मुलांच्या भविष्याबाबत योग्य निर्णय घेता येतील. व्यावसायिकांना जुन्या कर्जातून मुक्ती मिळून आर्थिक दिलासा मिळेल. धनलाभाच्या शक्यता प्रबळ असून समाजात तुमचं नेतृत्व अधोरेखित होईल. प्रभावशाली व्यक्तींशी संबंध प्रस्थापित होतील ज्याचा फायदा पुढील काळात होऊ शकेल.