ग्रहांचं गोचर होणार! सप्टेंबर महिन्यात या राशींच्या लोकांनी फक्त नोटा मोजायच्या, बक्कळ पैसा मिळणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिना अत्यंत खास मानला जात आहे. कारण या महिन्यात अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होणार आहे. पंचांगानुसार, 13 सप्टेंबर रोजी मंगळ कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल.
ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिना अत्यंत खास मानला जात आहे. कारण या महिन्यात अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होणार आहे. पंचांगानुसार, 13 सप्टेंबर रोजी मंगळ कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. त्याचवेळी मंगळ चित्रा आणि स्वाती नक्षत्रात गोचर करेल. यानंतर १७ सप्टेंबर रोजी सूर्य सिंह राशीतून कन्या राशीत जाईल. तसेच बुध ग्रह सिंह आणि कन्या राशीत भ्रमण करेल व मघा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, हस्त आणि चित्रा नक्षत्रात गोचर करेल.
advertisement
याशिवाय, दैत्यगुरू शुक्र कर्क आणि सिंह राशीत राहून आश्लेषा, मघा आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रांमध्ये भ्रमण करतील. देवगुरू बृहस्पती संपूर्ण सप्टेंबरमध्ये मिथुन राशी आणि पुनर्वसु नक्षत्रातच स्थिर राहतील. तर शनी मीन राशीत वक्री अवस्थेत राहून उत्तराभाद्रपद नक्षत्रात भ्रमण करतील. केतू सिंह राशीत पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात आणि राहू कुंभ राशीत पूर्वाभाद्रपद नक्षत्रात विराजमान असतील. या सर्व ग्रहांच्या बदलामुळे 12 पैकी काही राशींसाठी हा महिना अत्यंत शुभ ठरणार आहे.
advertisement
मेष राशी - सप्टेंबर महिना मेष राशीच्या लोकांसाठी भाग्याची साथ घेऊन येईल. अडकलेली कामे पूर्ण होतील आणि नवीन नोकरीची संधी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि आरोग्य उत्तम राहील. प्रेमसंबंध आनंदी राहतील. या महिन्यात उत्पन्नाचे नवे मार्ग उघडतील, तसेच कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. समाजात मान-सन्मान वाढेल आणि दीर्घकाळ थांबलेली कामे मार्गी लागतील.
advertisement
कर्क राशी - कर्क राशीच्या व्यक्तींसाठी सप्टेंबर महिना सुख-समृद्धी घेऊन येईल. अचानक धनलाभ होईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी किंवा व्यवसायात यश मिळेल. गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. या काळात तीर्थयात्रा किंवा दूर प्रवासाची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ होऊ शकते तसेच थकलेले पैसे परत मिळतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि प्रेमसंबंध मजबूत होतील.
advertisement
मिथुन राशी - मिथुन राशीच्या लोकांसाठीही सप्टेंबर महिना यशदायी ठरेल. या काळात नोकरी व व्यवसायात प्रगती होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी शुभ काळ आहे. कुटुंबातील जुने वाद मिटतील आणि सौहार्दाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन गोड राहील तसेच जोडीदाराकडून आनंदाची बातमी मिळेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबासह प्रवास घडेल आणि नोकरीत पदोन्नतीची शक्यता प्रबळ आहे.