शुक्र शनीची युती! 30 वर्षांनी आलाय योग,अडचणी दूर होणार, या राशीकडे धनसंपत्ती येणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : 2026 वर्षाची सुरुवात होताच ज्योतिषशास्त्रानुसार एक मोठा आणि अत्यंत शुभ ग्रहयोग तयार होत आहे. तब्बल 30 वर्षांनंतर शनीदेव आणि धन-वैभवाचा कारक शुक्र यांची युती मीन राशीत होणार आहे.
2026 वर्षाची सुरुवात होताच ज्योतिषशास्त्रानुसार एक मोठा आणि अत्यंत शुभ ग्रहयोग तयार होत आहे. तब्बल 30 वर्षांनंतर शनीदेव आणि धन-वैभवाचा कारक शुक्र यांची युती मीन राशीत होणार आहे. शनी हा कर्मफळ देणारा ग्रह मानला जातो, तर शुक्र हा ऐश्वर्य, संपत्ती, आलिशान जीवन, प्रेम आणि सुखाचा ग्रह आहे. त्यामुळे या दोन शक्तिशाली ग्रहांची युती अत्यंत भाग्यवर्धक मानली जाते.
advertisement
advertisement
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्र-शनी युती हा खूपच भाग्यशाली काळ ठरणार आहे. पैशांशी संबंधित अडचणी दूर होतील आणि उत्पन्नाचे अनेक नवे स्रोत निर्माण होतील. नोकरी आणि व्यवसाय दोन्ही क्षेत्रात मोठ्या संधी मिळू शकतात. प्रमोशनसाठी ज्यांची प्रतीक्षा लांबली होती त्यांच्यासाठी आता शुभ काळ येतोय. समाजात मान-सन्मान व प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात वाढेल. मात्र अतिताण घेणे टाळावे, कारण त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. वेळेवर विश्रांती घेणे, योग व व्यायाम सुरू केल्यास फायदा होईल.
advertisement
मकर - मकर राशीसाठीही हा ग्रहयोग अतिशय शुभ. करिअर आणि पैशांमध्ये मोठी भरभराट दिसून येईल. नवीन नोकरीची संधी, वाहन किंवा महाग वस्तू खरेदी करण्याचा योग संभवतो. दीर्घकाळापासून मनात असलेल्या एखाद्या इच्छेची पूर्ती होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि तुमच्या मतांना अधिक मान्यता मिळेल. प्रवास, कामाचे विस्तार आणि भागीदारी यामध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. एकूणच, हा काळ यश आणि आनंद घेऊन येणारा ठरेल.
advertisement
मीन - मीन राशीत शुक्र आणि शनीची युती होत असल्याने या राशीसाठी हा काळ सर्वाधिक प्रभावी राहील. आत्मविश्वास वाढेल, लोकप्रियता वाढेल आणि कामाचे कौतुक होईल. करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन प्रकल्प, टेंडर किंवा करार मिळण्याची शक्यता जास्त आहे. कामानिमित्त प्रवास वाढतील आणि या प्रवासातून चांगले लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्य स्थिर राहील, परंतु शरीराला थकवा जाणवल्यास विश्रांती घेणे गरजेचे. नियमित योग व व्यायाम केल्यास अधिक चांगले परिणाम दिसतील.


