आज 30 ऑगस्ट! बुध ग्रहाची कृपा होणार, 5 राशींना सोन्याचे दिवस येणार, राजासारखं आयुष्य जगणार

Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह (Budh Gochar) हा बुद्धी, विचार, संचार, तर्कशक्ती आणि व्यवसायाचा अधिपती मानला जातो. बुध ग्रहाच्या हालचालींमुळे व्यक्तीच्या बोलण्यात, विचारांमध्ये तसेच आर्थिक आणि व्यावसायिक जीवनात बदल दिसून येतात.
1/6
astrology news
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह (Budh Gochar) हा बुद्धी, विचार, संचार, तर्कशक्ती आणि व्यवसायाचा अधिपती मानला जातो. बुध ग्रहाच्या हालचालींमुळे व्यक्तीच्या बोलण्यात, विचारांमध्ये तसेच आर्थिक आणि व्यावसायिक जीवनात बदल दिसून येतात. 30 ऑगस्ट 2025 रोजी बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या बदलामुळे देशभरातील परिस्थितीवर तसेच सर्व 12 राशींवर विविध परिणाम दिसून येतील. काही राशींसाठी हा काळ शुभ तर काहींसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. पाहूया कोणत्या राशींना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
advertisement
2/6
मेष
मेष -   मेष राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा हा गोचर अत्यंत अनुकूल ठरणार आहे. तुमच्या कामकाजात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ चांगला असून संपत्तीत वाढ होईल. निर्णयक्षमता वाढेल आणि विचारांमध्ये स्पष्टता दिसून येईल. नोकरी अथवा व्यवसायात नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी हा योग्य काळ मानला जाईल.
advertisement
3/6
मिथुन
मिथुन -   मिथुन राशीचे स्वामीच बुध असल्याने या राशीवर बुध ग्रहाच्या हालचालींचा विशेष परिणाम दिसतो. सिंह राशीत बुधच्या प्रवेशामुळे मिथुन राशीच्या लोकांमध्ये विचार आणि भाषाशैलीत मोठा बदल होईल. वाणी प्रभावी होईल आणि त्यामुळे तुमच्या संपर्कातून नवे लाभ मिळतील. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. समाजात प्रतिष्ठा वाढेल.
advertisement
4/6
कर्क
कर्क -   कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ आर्थिक प्रगतीचा आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध होतील. घरगुती जीवनात समाधान आणि आनंद लाभेल. वैवाहिक जीवन सुखकर राहील. मानसिक स्थैर्यामुळे तुमच्या निर्णयक्षमतेत सुधारणा होईल. पूर्वीच्या अडचणी कमी होऊन प्रगतीचे नवे मार्ग खुलतील.
advertisement
5/6
सिंह
सिंह -   बुध ग्रह स्वतः सूर्याच्या राशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी आत्मविश्वास वाढविणारा हा काळ ठरेल. बुधच्या प्रभावामुळे तुमच्या नेतृत्वक्षमता आणि संवादकौशल्य अधिक प्रबळ होईल. करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. शिक्षण व स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना लाभ होईल.
advertisement
6/6
धनु
धनु -   धनु राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा हा गोचर विशेष शुभ मानला जातो. धनसंपत्ती आणि वैभवात वाढ होईल. देवी लक्ष्मीची कृपा लाभेल. व्यावसायिक व्यवहारांत लाभ मिळेल. काही जणांना परदेशी प्रवासाची किंवा नव्या करिअर संधीची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement