Aajache Rashibhavishya: मेष ते मीन राशींसाठी मकर संक्रांतीचा दिवस खास, पण किरकोळ चूक पडेल महागात, आजचं राशीभविष्य
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Daily Horoscope: मकर संक्रांतीचा दिवस मेष ते मीन राशींसाठी खास असणार आहे. तुमच्या नशिबात आज काय? याबाबत नाशिकचे ज्योतिषी अमोघ पाडळीकर यांनी माहिती दिलीये.
मेष राशी -कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. तुम्ही तुमचे काम चोख केले आहे - आणि आता तुम्हाला मिळणारे फायदे घेण्याची वेळ आली आहे. आजचा तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.
advertisement
वृषभ राशी - या राशीतील काही लोकांना आज जमिनीने जोडलेल्या काही मुद्यांना घेऊन धन खर्च करावे लागू शकते. आजच्या दिवशी कुठल्याही माहिती नसलेल्या गोष्टीत हात घालू नका. आपण जर परदेशातील नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर अर्ज करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. वैवाहिक आयुष्यातील कठीण टप्प्यानंतर आज थोडासा दिलासा मिळेल. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
मिथुन राशी - तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. तुम्ही तुमच्या खास पद्धतीने लोकांना हाताळलेत आणि तुमची बुद्धिमत्ता वापरलीत तर लोकांना समजावण्यात, पटविण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
कर्क राशी - अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. तुमच्या कामात तुमच्या विचारांशी-आवडीनिवडींशी मिळत्याजुळत्या व्यक्तींची मदत घ्या. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
सिंह राशी -वाद, संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. विवाहित दांपत्यांना आज आपल्या संतानच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील, आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. तुमचा/ तुमची जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे. आज तुम्हाला जोडीदाराकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
कन्या राशी -आज शांत राहा-तणावमुक्त राहाल. जे लोक आतापर्यंत पैशाचा विचार न करता खर्च करत होते त्यांना आज पैशाची अधिक आवश्यकता पडू शकते आणि आज तुम्हाला समजेल की, पैशाची आपल्या जीवनात काय किंमत असते. आज पासूनच आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा. अविवाहित लोकांना आज आनंदाची बातमी मिळेल. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
तूळ राशी - आपल्या कुटुंबियांच्या अपेक्षांना योग्य न्याय देता येईल असे काही तरी करणे गरजेचे आहे. कार्य क्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी - आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमत: फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.
advertisement
धनु राशी - आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे, थोडी मौज मजा, करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. जोडीदाराकडून आज चांगली बातमी मिळणार. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.
advertisement
मकर राशी - धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची आज तुम्हाला जाणीव होईल. आज केलेले सर्व कामे मार्गी लागतील. आपल्या जोडीदाराकडून आज काहीतरी आनंदाची बातमी ऐकून तुमचा दिवस आज आनंदी जाणार आहे. प्रवासाचा योग आज आहे पण प्रवास करताना काळजी घ्यावी लागेल. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.
advertisement
कुंभ राशी - तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला पर्याप्त धन प्राप्ती होईल. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
मीन राशी - आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल. नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. आज तुमच्या जोडीदार तुम्हाला आनंदाची बातमी देणार आहे. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement









