Weather Alert: मकर संक्रांतीला वारं फिरलं, महाराष्ट्रावर अवकाळी संकट, आज कुठं अलर्ट?

Last Updated:
Weather Alert: मकर संक्रांतीला राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. थंडीचा जोर काहीसा ओसरला असून नवं संकट घोंघावत आहे.
1/5
राज्यातील हवामानात सध्या स्थिरता नसल्याचं चित्र आहे. ढगाळ वातावरणाचा प्रभाव वाढत असल्याने कडाक्याची थंडी काहीशी ओसरली असून अनेक भागांत तापमानात चढ-उतार जाणवत आहेत. काही ठिकाणी हलक्या सरींची नोंद झाली असली, तरी बहुतांश भागांत ढगाळ हवामान आणि वाढलेला दमटपणा नागरिकांना जाणवत आहे. आज मकर संक्रांतीला देखील राज्यात अशीच परिस्थित राहणार आहे. 14 जानेवारी 2026 रोजीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.

advertisement
2/5
कोकण किनारपट्टीवर आज अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात सकाळी हलका गारवा जाणवेल, मात्र दिवसभर वातावरण दमट राहील. मुंबईत कमाल तापमान सुमारे 33 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. यासोबतच ठाणे नवी मुंबई, पालघर आणि कोकणात सुद्धा तापमान असच राहणार असल्याचं यासोबतच काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितले आहे. या सगळ्या ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा तीव्रपणा काहीसा कमी जाणवेल.

3/5
पश्चिम महाराष्ट्रात आज हवामान मिश्र स्वरूपाचं राहणार आहे. पुणे शहरात सकाळी आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते. येथे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहील. पुणे ग्रामीण भागासह सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता असून काही भागांत किरकोळ पावसाची शक्यता आहे. तापमानातील चढ-उतारांमुळे थंडी पूर्णपणे कमी झाल्याचं चित्र नाही.

4/5
मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा प्रभाव अद्याप जाणवत असला, तरी किमान तापमानात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि नांदेड परिसरात हवामान बहुतांश वेळा निरभ्र ते अंशतः ढगाळ राहणार आहे. या भागांत कमाल तापमान 27 ते 29 अंश सेल्सिअसदरम्यान, तर किमान तापमान 11 ते 13 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांतही अशीच परिस्थिती राहणार असून थंडीचा कडाका कमी झाला असला, तरी सकाळ-संध्याकाळी गारवा जाणवू शकतो. यासोबतच काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितले आहे.

5/5
एकंदरीत आज, 14 जानेवारी रोजी राज्यभरात ढगाळ ते अंशतः निरभ्र वातावरण राहणार असून तापमानात चढ-उतार सुरू राहण्याचा अंदाज आहे. पुढील दोन ते तीन दिवस हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता नसली, तरी ढगाळ वातावरण कायम राहू शकते. या बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement