18 व्या वर्षी लग्न, 26 व्या वर्षी उद्ध्वस्त झालं आयुष्य; बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठी अभिनेत्रीची Sad Story
- Published by:Minal Gurav
Last Updated:
हिंदी सिनेमा गाजवणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि तिच्या आयुष्याची स्टोरी. वयाच्या 18 व्या वर्षी तिनं लग्न केलं आणि पुढे जे झालं तुम्हीच वाचा.
कलारांचं पडद्यावर दिसणारं ग्लॅमरस आयुष्य आणि पडद्यामागचं आयुष्य यात खूप तफावत असते. हिंदी सिनेमा गाजवणाऱ्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं देखील हे अनुभवलं. वयाच्या 18 व्या वर्षी तिचं लग्न झालं. पण लग्नाचं सुख फार काळ टिकलं नाही. 26 व्या वर्षी ती विधवा झाली. पदरात दोन मुलं पण त्यातल्या एका तरुण मुलाला तिलाच खांदा देण्याची वेळ आलीय
advertisement
advertisement
दुर्गाबाई खोटे यांचा जन्म 14 जानेवारी 1905 रोजी मुंबईत झाला. कुटुंब बरेच श्रीमंत होतं. गोव्यातील कोकणी कुटुंबात जन्मलेल्या दुर्गा खोटे तिच्या जन्मानंतर लगेचच मुंबईत आल्या. दुर्गा खोटे यांचे वडील पांडुरंग श्यामराव लॉर्ड हे मुंबईतील एक प्रसिद्ध वकील होते. दुर्गा लहानपणापासूनच एक हुशार विद्यार्थीनी होती. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दुर्गा खोटे यांच्या कुटुंबाने लग्नाची चर्चा केली.
advertisement
दुर्गा यांना आधी बॅचलर पदवी घ्यायची होती. दुर्गाच्या वडिलांनी तिला सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश दिला. दरम्यान दुर्गाच्या आईने तिचे लग्न करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर दुर्गाचे लग्न विश्वनाथ खोटे यांच्याशी झाले. विश्वनाथ हे सुशिक्षित, नुकताच लंडनहून परत आले होते. होता. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली. दुर्गाबाई 26 वर्षांच्या असताना त्यांच्या पतीचं निधन झालं. दोन मुलांना एकटीनं वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली.
advertisement
पतीच्या मृत्यूनंतर दुर्गा खोटे तिच्या मुलांसह तिच्या पालकांच्या घरी परतल्या. तिच्या मुलांना तिच्या आईकडे सोडून दुर्गा कामावर जात असे. त्या ज्या शाळेत शिकल्या त्याच शाळेत नोकरी शोधली पण ग्रॅज्युएशन नसल्याने त्यांना नोकरी मिळाली नाही. पण शाळेतील एका शिक्षिकेनं त्यांच्यासाठी एका मुलाला शिकवण्याची व्यवस्था केली.
advertisement
एके दिवशी दुर्गा खोटे शिकवणीवरून घरी परतल्या तेव्हा तिला तिच्या बहिणीसोबत सूट आणि बूट घातलेला एक माणूस दिसला. दुर्गाच्या बहिणीने त्याची ओळख जेबीएच वाडिया अशी करून दिली. तो माणूस फरेबी जाल नावाचा चित्रपट बनवत आहे आणि ती एका महिला मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमातून 1932 साली दुर्गा खोटे यांच्या अभिनय प्रवास सुरू झाला.
advertisement
advertisement
50 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 26व्या वर्षी नवरा गमावला. दोन्ही मुलांना एकट्यानं वाढवलं आणि त्यांच्यावर पुन्हा एक मोठा आघात झाला. दुर्गाबाईंचा एक मुलगा ऐन तारुण्यात निधन पावला. त्यांनी स्वतः मुलाच्या शेवटच्या क्षणी खांदा दिला होता. त्यानंतर दुर्गा बाईंनी त्यांच्या सुनेचं आनंदानं दुसरं लग्न करून दिलं होतं.








