Aajache Rashibhavishya: विवाह, पैसा अन् नोकरी; मेष ते मीन राशींसाठी मंगळवार कसा? आजचं राशीभविष्य
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Horoscope Today: आजचा मंगळवार मेष ते मीन 12 राशींसाठी संमिश्र स्वरुपाचा असेल. कुणाला पैसा, प्रतिष्ठा मिळेल. तर कुणाला नव्या आव्हानांचा सामना करावा लागेल. आजचं राशीभविष्य पाहा.
मेष राशी- आज आर्थिक पक्ष चांगले राहील परंतु, यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की, तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
वृषभ राशी - आध्यात्मिक व्यक्तीच्या शुभाशिर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. आज तुमचा शुभ अंक 5 असणार आहे.
advertisement
मिथुन राशी - आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. पूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. वेळेवर सचेत राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. सहकुटुंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. विवाह हे एक वरदान आहे, आणि आज तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement
कर्क राशी - आपल्या आरोग्याची उगाच चिंता करू नका, त्यामुळे आपला आजार बिघडण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. आज तुमचा दिवस खर्चिक असणार आहे. हाती घेतलेले कामे पूर्ण करा त्याचा लाभ नक्की होईल. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
advertisement
कन्या राशी - रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे हे अधोगतीचे लक्षण आहे. इतरांनी आपले काम करावे अशी अपेक्षा बाळगू नका. मन रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल. तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.
advertisement
तुळ राशी - या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धन लाभ होऊ शकतो. तुम्हाला कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळीसमवेत आज भरपूर वेळ घालवता येईल. आजच्या दिवशी तुमच्या ध्येयपूर्तीच्या दृष्टीने अत्यंत उत्तम संधी चालून येतील. तुमचा किमती वेळ खराब होईल. विवाह हे एक वरदान आहे, आणि आज तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी - तुमच्या जवळ आज पैसा ही पर्याप्त असेल आणि या सोबतच मनात शांती असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. आज तुम्ही नवीन वस्तू घेत असला तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ असणार आहे. दैनंदिन गरजा न भागविल्या गेल्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात काहीसा तणाव निर्माण होईल. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मीन राशी - आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. एकमेकांचा दृष्टिकोन समजावून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता अधिक आहे. तुमच्या घरातील कुणी सदस्य आज तुमच्यासोबत वेळ घालवण्याचा हट्ट करू शकतो, ज्या कारणाने तुमचा काही वेळ खराब ही होईल. आज तुमचा शुभ अंक हा 7 असणार आहे.
advertisement









