नवीन वर्ष सुरू होताच शनिदेव कोपणार? या राशीच्या लोकांवर येणार मोठी संकटं

Last Updated:
Shani Dev : दोन महिन्यांनी 2026 वर्षाचे आगमन होणार आहे आणि नव्या वर्षाबरोबर ग्रहस्थितीतही महत्त्वपूर्ण बदल दिसून येणार आहेत. विशेषतः शनिग्रहाचा प्रभाव 2026 मध्ये सर्वाधिक राहणार असून, ज्योतिषशास्त्रानुसार शनि नवीन वर्षात कोणतीही राशी बदलणार नाही.
1/6
astrology news
दोन महिन्यांनी 2026 वर्षाचे आगमन होणार आहे आणि नव्या वर्षाबरोबर ग्रहस्थितीतही महत्त्वपूर्ण बदल दिसून येणार आहेत. विशेषतः शनिग्रहाचा प्रभाव 2026 मध्ये सर्वाधिक राहणार असून, ज्योतिषशास्त्रानुसार शनि नवीन वर्षात कोणतीही राशी बदलणार नाही. तो सध्या मीन राशीत आहे आणि संपूर्ण वर्षभर याच राशीत वास्तव्य करणार आहे. शनीची चाल ही फक्त राशी बदलण्यापुरती मर्यादित नसून ती मानवी मन, नाती आणि भावनिक जगावर दूरगामी परिणाम घडवते.
advertisement
2/6
astrology
नव्या वर्षात लोकांच्या वागण्यात आणि भावनिक भावनांमध्ये मोठा बदल दिसून येईल. हे वर्ष बोलण्यापेक्षा विचार करण्यावर जास्त भर देणारे ठरेल. प्रेम, विश्वास आणि संवाद यामध्ये घट होऊन शंका, गोंधळ आणि शांततेमागील अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
3/6
astrology
विशेषतः कर्क, मीन, तूळ आणि धनु या चार राशींवर शनिचा प्रभाव सर्वाधिक पडणार आहे. कर्क आणि मीन राशीच्या व्यक्तींना भावनिक चढउतार आणि अस्वस्थता जाणवू शकते. तूळ राशीच्या व्यक्तींना नात्यांमध्ये गंभीर परीक्षा द्यावी लागू शकते, तर धनु राशीला कौटुंबिक जबाबदा-या आणि तणावाचा भार वाढून मानसिक थकवा जाणवू शकतो. त्यामुळे या राशींनी 2026 मध्ये स्वतःच्या भावनांना समजून घ्यायला, संवाद वाढवायला आणि मानसिक स्वास्थ्याकडे अधिक लक्ष द्यायला तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.
advertisement
4/6
astrology
शनि जेव्हा जलतत्त्वांना स्पर्श करतो, तेव्हा भावना दडपल्या जातात आणि संवेदनशीलता आणखी तीव्र होते. त्यामुळे 2026 मध्ये लोक अनेक गोष्टी मनात साठवून ठेवतील, परंतु शब्दांत व्यक्त करणार नाहीत. छोटीशी गोष्ट मनाला लागेल, पण व्यक्त न केल्याने मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. जगाला न दाखवता वेदना मनात दडपून ठेवण्याचं वर्ष म्हणूनही 2026 पाहिले जात आहे.
advertisement
5/6
astrology
या प्रभावाचा सर्वांत जास्त परिणाम घरांवर आणि वैयक्तिक नात्यांवर होऊ शकतो. कुटुंबात शांतता वाढेल, पण ती आनंदाची नव्हे तर मनातील अंतरांची असेल. एकाच घरात राहूनही प्रत्येक सदस्य आपल्या डिजिटल जगात बुडालेला दिसू शकतो. मोबाईल स्क्रीनमुळे संवाद कमी होईल आणि पती-पत्नी, पालक-मुलांमध्ये गैरसमज वाढू लागतील. वडीलधारी मंडळी तुटलेपणा आणि एकटेपणा अनुभवतील.
advertisement
6/6
astrology
ज्योतिषशास्त्रानुसार 2026 मध्ये प्रेम, नात्यांचे स्थैर्य आणि घरगुती वातावरण ही तीन क्षेत्रे सर्वाधिक प्रभावित होतील. कारण प्रेमाचा कारक शुक्र ग्रह, शनीच्या सावलीत दबून जाणार आहे.शुक्र कमकुवत झाला की प्रणय, आपुलकी आणि आकर्षण कमी होते. परिणामी जोडप्यांमध्ये अंतर वाढू शकते, मतभेद तीव्र होऊ शकतात, आणि काही नात्यांमध्ये ब्रेकअप किंवा घटस्फोटाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे तात्काळ नाही, तर शनि हळूहळू, नकळत आणि दीर्घकाळ परिणाम करीत नाते बदलवेल.
advertisement
''३१ मजल्यावरून मी...'', पंकजा मुंडेंच्या पीएने पत्नीच्या टोकाच्या पावलावर सगळंच सांगितलं, प्रकरणाला नव वळण?
पत्नीने गळफास घेतला, “३१ मजल्यावरून मी…”, अनंत गर्जेंने नेमकं काय सांगितलं?
  • ''३१ मजल्यावरून मी...'', पंकजा मुंडेंच्या पीएने पत्नीच्या टोकाच्या पावलावर सगळंच

  • ''३१ मजल्यावरून मी...'', पंकजा मुंडेंच्या पीएने पत्नीच्या टोकाच्या पावलावर सगळंच

  • ''३१ मजल्यावरून मी...'', पंकजा मुंडेंच्या पीएने पत्नीच्या टोकाच्या पावलावर सगळंच

View All
advertisement