Chandra Grahan 2025: अलर्ट! चंद्रग्रहणाचा अशुभ प्रभाव दिसणार; काळ्याकुट्ट छायेचा 5 राशींवर वाईट परिणाम
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Chandra Grahan 2025 Negative Effects: या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण रविवार, 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. भारतात दिसणारे हे खग्रास चंद्रग्रहण रात्री 8:58 वाजता सुरू होऊन ते मध्यरात्री 1:25 वाजता संपेल. चंद्रग्रहणाच्या दिवशी 5 राशीच्या लोकांना खूप काळजी घ्यावी लागेल. चंद्रग्रहणाचा नकारात्मक परिणाम त्यांच्या जीवनावर दिसून येतो आणि अशांतता निर्माण होऊ शकते. चंद्रग्रहणाचा राशींवर होणारा नकारात्मक परिणाम जाणून घेऊया.
मेष: वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण मेष राशीच्या लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम करू शकते. करिअरमध्ये तुमच्यासाठी प्रतिकूल परिस्थिती आहे, तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. डोळे उघडे ठेवा, अन्यथा संधी निसटतील. कोणी तुम्हाला या दिवशी सल्ला देत असेल तर ते काळजीपूर्वक ऐका, अन्यथा तुमचेच नुकसान होऊ शकते. कठीण काळात इतरांची मदत घेणे चुकीचे नाही. प्रेम जीवनात तुमच्या जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या, अन्यथा परिस्थिती बिघडू शकते.
advertisement
वृषभ: चंद्रग्रहणाच्या दिवशी, वृषभ राशीच्या लोकांवर एखाद्या गोष्टीचा आरोप होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या भावना दुखावतील. तुम्हाला या आरोपांपासून सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या दिवशी तुमचा राग नियंत्रणात ठेवा, अहंकाराचा वारा लागू देऊ नका. यशासोबत नम्रता असली पाहिजे अन्यथा बरेच लोक तुमचे शत्रू बनतील. या दिवशी तुमच्या बोलण्याने किंवा वागण्याने कोणी दुःखी होऊ शकते. काही समस्या उद्भवली तर संयमाने त्याचे निराकरण करावे.
advertisement
कन्या: चंद्रग्रहणाच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा तुम्ही आवेगी होऊन स्वतःचे नुकसान कराल. या दिवशी तुमच्या आयुष्यात गोंधळ निर्माण होऊ शकतो. तुम्ही संयमाने काम केले तर गोष्टी सोप्या होतील, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. मन शांत ठेवून काम केले तर तुम्ही यशस्वी व्हाल. संकटाच्या वेळी धीर धरणे महत्त्वाचे आहे. आज तुमच्या मानसिक आरोग्याची विशेष काळजी घ्या.
advertisement
वृश्चिक: चंद्रग्रहण असल्यानं वृश्चिक राशीच्या लोकांनी नकारात्मक विचार असलेल्या लोकांपासून दूर राहावे. अन्यथा हे लोक तुमची शांती भंग करू शकतात. त्यांचे नकारात्मक विचार तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात. या दिवशी तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका किंवा नियम मोडू नका अन्यथा त्रास होईल. काही लोक तुमचा हेवा करू शकतात, म्हणून थोडे सावध राहणे चांगले.
advertisement
धनु: चंद्रग्रहणाच्या दिवशी धनु राशीच्या लोकांना त्यांच्या कौटुंबिक जीवनात कलहाचा सामना करावा लागू शकतो. या दिवशी ऑफिसच्या राजकारणापासून दूर रहा, अन्यथा तुम्ही वादात अडकू शकता. यामुळे तुमच्या जीवनातील शांती भंग होऊ शकते. मानसिक ताण फार वाढू. तुम्ही तुमच्या सध्याच्या नोकरीमुळे अस्वस्थ असाल. तुमच्या आयुष्यातील कठीण अनुभव तुम्हाला त्रास देऊ शकतात. भावनिकदृष्ट्या, तुम्ही स्वतःला कमी समजू शकता.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)