Chandra Grahan 2024: गणपती विसर्जनाबरोबर चंद्राला ग्रहण! सूतककाळ नसला तरी या राशींना अशुभ ठरणार

Last Updated:
Chandra Grahan 2024: चंद्र आणि सूर्यग्रहण या खगोलशास्त्रीयदृष्ट्या घटना असल्या तरी ज्योतिषशास्त्रातदेखील ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. यंदाचं दुसरं चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यात होत आहे. चंद्रग्रहणाचा सूतक काळ, भारतात हे ग्रहण दिसणार की नाही, तसेच त्याचा राशींवर कसा परिणाम होईल, याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. 
1/7
हिंदू पंचांगानुसार 2024 मध्ये दोन वेळा चंद्र ग्रहण होतं. पहिलं चंद्र ग्रहण 25 मार्च रोजी लागलं होतं. आता दुसरं आणि या वर्षीचं शेवटचं चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यात असेल. ज्योतिषशास्त्रानुसार हे ग्रहण खूप खास असेल. चंद्र ग्रहण हे नेहमी पौर्णिमेच्या दिवशी असतं.

advertisement
2/7
यंदा 18 सप्टेंबरला म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेला दुसरं चंद्रग्रहण असेल. हे चंद्र ग्रहण 18 तारखेला सकाळी सहा वाजून 11 मिनिटांनी सुरू होईल आणि 10 वाजून 17 मिनिटांनी संपेल. या ग्रहणाचा एकूण कालावधी चार तास सहा मिनिटांचा असेल.

3/7
हिंदू धर्मानुसार, ग्रहण सुरू होण्यापूर्वीचा कालावधी, ग्रहण काळ आणि ग्रहणानंतरचा काही वेळ हा अशुभ मानला जातो. याला सूतक काळ असं म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा सूतक कालावधी ग्रहणापूर्वी 9 तास सुरू होतो. जे ग्रहण डोळ्यांनी पाहता येत नाही, त्यासाठी कोणताही सूतक काळ नसतो.

4/7
सप्टेंबरमधील चंद्रग्रहण चंद्रास्तानंतर आणि सूर्योदयावेळी म्हणजेच दिवसा असल्याने ते भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा कोणताही सूतक काळ नसेल.

5/7
ग्रहणावेळी चंद्र मेष राशीत असेल. ही सूर्याची उच्च तर मंगळाची स्वरास आहे. सूतक काळ नसला तरी या ग्रहणाचा परिणाम सर्व राशींवर पाहायला मिळेल. काही राशीच्या व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो तर काही राशीच्या व्यक्तींसाठी हे ग्रहण शुभफलदायी असेल.

6/7
मेष, मिथुन, कर्क, कन्या, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीच्या व्यक्तींसाठी हे ग्रहण नकारात्मक असेल. वृषभ, सिंह, धनू आणि मकर राशीच्या व्यक्तींसाठी हे ग्रहण सकारात्मक असेल.

7/7
भाद्रपद पौर्णिमेला सकाळी असलेले हे ग्रहण दिवसा असेल. जेव्हा चंद्र ग्रहणाला प्रारंभ होईल तेव्हा भारतात चंद्रास्त झालेला असेल. त्यामुळे हे ग्रहण भारतात दिसणार नाही. चंद्र ग्रहणाला सुरूवात होतेवेळी वायव्य आणि आग्नेय भारतातील शहरांमध्ये चंद्रास्त होत असेल. त्यामुळे याभागात चंद्राचा प्रकाश थोडा धूसर होऊ शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
भाद्रपद पौर्णिमेला सकाळी असलेले हे ग्रहण दिवसा असेल. जेव्हा चंद्र ग्रहणाला प्रारंभ होईल तेव्हा भारतात चंद्रास्त झालेला असेल. त्यामुळे हे ग्रहण भारतात दिसणार नाही. चंद्र ग्रहणाला सुरूवात होतेवेळी वायव्य आणि आग्नेय भारतातील शहरांमध्ये चंद्रास्त होत असेल. त्यामुळे याभागात चंद्राचा प्रकाश थोडा धूसर होऊ शकतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement