Gajkesari Yog: तुळशी विवाह दिवशी गजकेसरी राजयोग! या राशींचे सुरू होणार सोनेरी दिवस, धनलाभ संभवतो
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Tulsi Vivah Gajkesari Yog: कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशीविवाह केला जातो. यंदा हा सण शुक्रवारी 24 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. या दिवशी लक्ष्मीचे रूप असलेल्या तुळशीचे आणि विष्णूचे रूप असलेल्या शाळीग्रामची पूजा विधीपूर्वक केली जाते. या दिवशी तुळशी आणि शाळीग्रामचा प्रतिकात्मक विवाह केल्यास कन्यादान केल्यासारखे पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. तुळशीविवाहाच्या निमित्ताने अनेक शुभ योगांसोबत गजकेसरी योगही तयार होत आहे. जाणून घेऊया तुळशी विवाहात गजकेसरी योगाचा लाभ कोणत्या राशींना मिळणार आहे.
हिंदू कॅलेंडरनुसार, चंद्र 24 नोव्हेंबरला संध्याकाळी 4 वाजता मेष राशीत प्रवेश करत आहे, तिथे तो 26 नोव्हेंबरला संध्याकाळी 7:55 पर्यंत राहील. गुरू बृहस्पति आधीच मेष राशीत आहे. अशा स्थितीत चंद्र आणि गुरूच्या संयोगामुळे शक्तिशाली गजकेसरी योग तयार होत आहे. यासोबतच 24 नोव्हेंबरला तुळशी विवाहासह सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योग तयार होत आहे. या योगांच्या निर्मितीमुळे काही राशींना संपत्ती आणि ऐश्वर्यामध्ये भरपूर लाभ मिळू शकतात आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली अपूर्ण कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. या दुर्मिळ संयोगांचा प्रभाव दीर्घकाळ टिकेल.
advertisement
मेष - या राशीत देवतांचा गुरू बृहस्पति आणि चंद्र यांचा संयोग होत आहे. अशा स्थितीत मेष राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. 2024 पर्यंत, या राशीच्या लोकांवर भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची कृपा असेल, ज्यामुळे सुख, समृद्धी आणि संपत्तीमध्ये वाढ होईल. त्यामुळे प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement