RashiBhavishya: 'गंडा' बसणार? गंड योगात या 5 राशींवर मोठं संकट, वादात अडकणं पडेल महागात
- Published by:Ramesh Patil
- Written by:Deepika Kulshreshtha
Last Updated:
Rashi Bhavishya In Marathi: कसा असेल आजचा दिवस, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. पहा आजचं दैनिक राशीभविष्य 18 सप्टेंबर 2024
मेष (Aries) : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. ऑफिसमध्ये काम करताना यश मिळेल. तुमचं ध्येय साध्य कराल. कुटुंब व मित्रांकडून प्रेम आणि पाठिंबा मिळाल्यानं यशाच्या दिशेनं वाटचाल करण्यास मदत होईल. आर्थिकदृष्ट्या पैसे खर्च करताना नियंत्रण ठेवा. तुमचं उत्पन्न व खर्च या दोन्हींचा ताळमेळ ठेवून आर्थिक नियोजन करा. त्यासाठी ही योग्य वेळ आहे. आज तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होईल; पण त्यासाठी जबाबदाऱ्या नीट समजून घेऊन त्यानुसार काम करणं फायद्याचं ठरेल. नोकरदार कामात व्यग्र राहतील. यश मिळेल.Lucky Colour : Sky BlueLucky Number : 1
advertisement
वृषभ (Taurus) : आज तुमच्या जवळच्या व्यक्तीच तुमच्यावर रागावू शकतात. अशा परिस्थितीत शांत राहा, फायद्याचं ठरेल. आर्थिकदृष्ट्या खर्चाकडे लक्ष द्या. अन्यथा भविष्यात पैशाची कमतरता जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्या. मानसिक आरोग्य उत्तम राहावं, यासाठी प्रयत्न करा. मानसिकदृष्ट्या खंबीर राहा. आवडत्या छंदासाठी वेळ काढा. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने दिलासादायक दिवस आहे. ऑफिसमध्ये काम करताना यश मिळावं, यासाठी प्रयत्न करा.Lucky Colour : GreenLucky Number : 5
advertisement
मिथुन (Gemini) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे. तुमची न्यायालयात एखादी केस सुरू असल्यास तिचा निकाल तुमच्या बाजूनं लागू शकतो. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराला एक खास भेटवस्तू दिल्यानं नातं दृढ होईल. ऑफिसमध्ये आवश्यक कामं वेळेवर पूर्ण करा. आर्थिकदृष्ट्या तुमचं उत्पन्न व खर्च या दोन्हीचा ताळमेळ ठेवा, फायद्याचं ठरेल. कोणत्याही गोष्टीची सुरुवात काळजीपूर्वक करा. निर्णय विचारपूर्वक घ्या. आरोग्याची काळजी घ्या.Lucky Colour : BrownLucky Number : 6
advertisement
कर्क (Cancer) : आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक आहे. अशा परिस्थितीत काळजीपूर्वक पुढं जाणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासातून विश्रांती घ्यावी, त्यासाठी योग्य वेळ आहे. तुम्हाला यशाकडे घेऊन जाणारा हा दिवस असून आज यशाच्या शिखराला स्पर्श करण्याची संधी मिळेल. इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, यश मिळेल. अडचणींचा सामना करा. संयम ठेवा. आवडत्या छंदासाठी वेळ काढा, फायद्याचं ठरेल.Lucky Colour : PinkLucky Number : 10
advertisement
सिंह (Leo) : आज व्यवसायिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा दिवस आहे. व्यवसायात नवीन प्लॅन राबविल्यानं यश मिळेल. तुमचं उत्पन्न, बँकेतली बचत वाढेल. ऑफिसमध्ये स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करून स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा. प्रेमाच्या बाबतीत जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी योग्य काळ आहे. मनोरंजनात्मक कार्यक्रमावर पैसे खर्च होतील. अविवाहितांचा लग्न जुळण्याचा योग आहे. तुमच्या मालकीच्या घरासाठी, वाहनासाठी एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी अनुकूल वेळ आहे. आरोग्याची काळजी घ्या.Lucky Colour : Dark GreenLucky Number : 2
advertisement
कन्या (Virgo) : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल नाही. दैनंदिन कामात अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. आरोग्याची काळजी घ्या. अन्यथा त्रास होऊ शकतो. नातेवाईकांकडून एखादी भेटवस्तू मिळाल्यानं आनंद होईल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. दोघांमधील नातं अधिक दृढ होईल. नोकरदार कामात व्यग्र राहतील. वरिष्ठांकडून कामाचं कौतुक होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल.Lucky Colour : BlueLucky Number : 11
advertisement
तूळ (Libra) : ऑफिसमध्ये काम करताना उत्साह कायम ठेवा. काम वेळेवर पूर्ण करण्यास प्राधान्य द्या. स्वतःवर विश्वास ठेवा. निश्चय कायम ठेवा. सहकाऱ्यांसोबत चांगला वेळ घालवण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. प्रेमाच्या बाबतीत जोडीदारावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. नात्यातली स्पष्टता आज दिसून येईल. आज उद्भवणाऱ्या परिस्थितीला आत्मविश्वासानं सामोरं जा, फायद्याचं ठरेल. यश मिळेल. नवीन संधी येतील. आरोग्य चांगलं राहील. आर्थिकदृष्ट्या समृद्धी मिळेल.Lucky Colour : BlackLucky Number : 12
advertisement
वृश्चिक (Scorpio) : आज विद्यार्थ्यांना अभ्यासातून विश्रांती घेता येईल. आगामी काळात उत्साह टिकून ठेवण्यासाठी ते महत्त्वाचं आहे. ऑफिसमध्ये काम करताना संयम ठेवा. उत्साहानं काम करण्यास प्राधान्य द्या. योग्य निर्णय घ्या. यशाकडे वाटचाल करण्यासाठी भावनांवर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. व्यावसायिक दृष्टिकोनातून आज एखादा नवीन व रोमांचक अनुभव तुम्हाला येईल.Lucky Colour : PurpleLucky Number : 9
advertisement
धनू (Sagittarius) : आज ऑफिसमधल्या राजकारणापासून दूर राहा. अन्यथा काम करताना अडचणी येतील. जोडीदारासोबत सायंकाळ आनंदात जाईल. करमणुकीच्या साधनांवर लक्ष केंद्रित करणं फायद्याचं ठरेल. खर्च करताना काळजी घ्या. योग्य आहार घ्या. व्यवसायात नवीन योजनांचा, संधीचा स्वीकार करण्यासाठी योग्य वेळ आहे. व्यवसाय प्रगतीकडे नेण्यासाठी ते योग्य ठरेल. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगलं राहील.Lucky Colour : MagentaLucky Number : 7
advertisement
मकर (Capricorn) : आज ऑफिसमध्ये काम करताना लक्ष केंद्रित करा. अन्यथा चुका होतील. बॉसशी चांगले संबंध ठेवा. यश मिळेल. येणाऱ्या काळात फायदा होईल. नातेवाईकांशी वाद टाळा. विद्यार्थ्यांना अभ्यासातून विश्रांती मिळेल. ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट व प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करा. आरोग्याची काळजी घ्या.Lucky Colour : Navy BlueLucky Number : 8
advertisement
कुंभ (Aquarius) : आजचा दिवस प्रेमाच्या बाबतीत तुमच्यासाठी उत्तम आहे. जोडीदारासोबत रोमँटिक डिनर डेटवर जाण्यासाठी, काही निवांत क्षण जोडीदारासोबत घालवण्यासाठी उत्तम वेळ आहे. जोडीदाराशी भविष्याबद्दल चर्चा करा. भविष्याच्या दृष्टीने योजना तयार करा, फायद्याचं ठरेल. तुमच्या दोघांतलं नातं अधिक दृढ होईल. व्यवसायात स्थिरता राहण्यासाठी तुमचं काम वेळेवर पूर्ण करा. यश मिळवण्यासाठी विचार स्पष्टपणे मांडा. आरोग्याची काळजी घ्या. योग्य आहार, व्यायामास प्राधान्य द्या.Lucky Colour : WhiteLucky Number : 3
advertisement
मीन (Pisces) : आज ऑफिसमध्ये कामावर लक्ष केंद्रित करा. अन्यथा ते पूर्ण करण्यासाठी जास्त परिश्रम करावे लागू शकतात. स्वतःची वृत्ती बदलण्याचा प्रयत्न करा, फायद्याचं ठरेल. अतिउत्साहात कोणतंही काम करू नका. अन्यथा गैरसमज होऊ शकतो. आर्थिक दृष्टिकोनातून आव्हानांना सामोरं जावं लागेल. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा. अन्यथा नंतर समस्या उद्भवतील. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल.Lucky Colour : OrangeLucky Number : 15


