Astrology: भयंकर टेन्शन, निगेटिव्ह विचारांचे काहुर.! मंगळाचा त्रास या राशीच्या लोकांना असह्य करेल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology Marathi: ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाच्या स्थितीला वेगळं महत्त्व आहे. शनिनंतर मंगळाच्या स्थितीला लोक घाबरतात. त्यातच आज 19 नोव्हेंबर रोजी मंगळ सायंकाळी 7:40 वाजता ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह हा ज्येष्ठा नक्षत्राचा स्वामी आहे. मंगळ नवीन नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम राशीचक्रावर दिसतो, करिअरवर आणि नातेसंबंधांवर प्रभाव होतो.
मंगळाच्या स्थितीत बदल झाल्यानंतर लगेच संबंधित काही राशीच्या लोकांवर परिणाम दिसून येतो. मंगळाच्या स्थितीमुळे जीवनात गडबड गोंधळ आणि संघर्ष अशा गोष्टी घडतात. शिवाय, जेव्हा मंगळ नक्षत्र बदलतो तेव्हा काही राशींना अचानक मूड स्विंग आणि जबाबदाऱ्यांचं ओझं खांद्यावर पडून बिकट परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो. मंगळाच्या स्थितीमुळे लोकांना सावध राहावं लागतं.
advertisement
मेष - सध्या मंगळाच्या नक्षत्रात होत असलेला बदल मेष राशीसाठी नकारात्मक मानला जातोय. घाईघाईत कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळा. नातेसंबंधांमध्ये क्षुल्लक गोष्टींवरून वाद होऊ शकतात. गाडी चालवताना सावधगिरी बाळगा, कारण मंगळाच्या प्रभावामुळे निष्काळजीपणा वाढू शकतो. कामात घाई केल्यानं नुकसान होऊ शकतं, म्हणून या काळात संयम ठेवा.
advertisement
कर्क- कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळाच्या नक्षत्रातील बदल अशुभ मानला जातोय. कर्क राशीच्या लोकांना या काळात मानसिक त्रास होऊ शकतो. भावनांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक असेल, कारण लहान-सहान गोष्टींचा मनावर ताण वाढू शकतो. कुटुंबात किंवा नातेसंबंधात गैरसमज होण्याची शक्यता आहे. सध्या कोणतेही मोठे आर्थिक निर्णय पुढे ढकलणे चांगले.
advertisement
कन्या - मंगळाच्या नक्षत्रातील बदलाचा थेट परिणाम कन्या राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसेल. त्याचा परिणाम भागीदारी, वैवाहिक जीवन आणि व्यावसायिक संबंधांवर होऊ शकतो. जवळच्या लोकांचे शब्द तुमच्या मनावर अपेक्षेपेक्षा जास्त परिणाम करू शकतात, ज्यामुळे चिडचिडेपणा वाढू शकतो. या राशीच्या व्यावसायिकांनाही काळ चांगला नसेल. कोणतेही काम नीट विचारपूर्वक करा. आर्थिक जोखीम किंवा मोठी गुंतवणूक टाळा.
advertisement
धनु - मंगळाच्या नक्षत्रातील बदलामुळे धनु राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी दबाव येऊ शकतो. वरिष्ठांशी संवाद साधताना तुमच्या बोलण्यात संयम ठेवा. जास्त कष्ट करूनही परिणाम चांगले मिळण्याची शक्यता नाही. हा काळ आरोग्याबाबतही फारसा चांगला दिसत नाही.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


