16 डिसेंबरला पहाटे 4 वाजून 26 मिनिटांपासून या राशींचा गोल्डन टाइम होणार सुरू, अडचणी सुटणार, श्रीमंती येणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Mangal Surya Yuti 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालींना विशेष महत्त्व दिलं जातं. त्यातही मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती मानलं जातं.
वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालींना विशेष महत्त्व दिलं जातं. त्यातही मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती मानलं जातं. आत्मविश्वास, धाडस, ऊर्जा, पराक्रम आणि निर्णायक क्षमता या गुणांचा तो कारक आहे. मंगळ प्रत्येक राशीत साधारण 45 दिवसांचा कालावधी घालवतो. त्यामुळे पूर्ण राशीचक्र पार करण्यासाठी त्याला सुमारे दीड वर्षांपेक्षा अधिक वेळ लागतो. या प्रवासात मंगळाचा अनेक ग्रहांशी संयोग होत असतो आणि अशाच संयोगांमुळे अनेक शुभ-अशुभ योग तयार होतात.
advertisement
डिसेंबर 2025 मध्ये मंगळ ग्रह एक अत्यंत महत्त्वाचा योग निर्माण करणार आहे. ग्रहांचा राजा सूर्य आणि मंगळ यांची युती धनु राशीत होणार असून, या संयोगामुळे ‘मंगळ आदित्य योग’ निर्माण होईल. हा योग अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा ठरणार असल्याचं ज्योतिषतज्ज्ञ सांगतात. विशेषतः तीन राशींना या योगाचा मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 7 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजून 27 मिनिटांनी मंगळ ग्रह धनु राशीत प्रवेश करेल. तो 16 जानेवारी 2026 पर्यंत या राशीत स्थिर राहणार आहे. दरम्यान, सूर्य ग्रह 16 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 4 वाजून 26 मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करेल. याच राशीत सूर्य आणि मंगळ यांची युती होणार असून, त्यामुळे 14 जानेवारी 2026 पर्यंत मंगळ आदित्य योग सक्रिय राहील. हा काळ अनेकांसाठी संधी आणि प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो.
advertisement
धनु रास - धनु राशींसाठी हा काळ अतिशय शुभ संकेत देणारा आहे. मंगळ आणि सूर्य यांची युती तुमच्या आत्मविश्वासात वाढ करेल. बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता अधिक प्रभावी होईल, ज्याचा फायदा करिअर आणि शिक्षण क्षेत्रात होऊ शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता असून, उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होऊ शकतात. दीर्घकाळ रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यताही आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही काळ अनुकूल असला, तरी वैयक्तिक नात्यांमध्ये थोडा संयम ठेवणं आवश्यक ठरेल.
advertisement
तूळ रास - तूळ राशीच्या लोकांसाठी मंगळ आदित्य योग आर्थिक स्थैर्य आणि यश घेऊन येणारा ठरू शकतो. या काळात नशिबाची साथ लाभेल आणि धनसंपत्तीत वाढ होण्याचे संकेत आहेत. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल, तसेच प्रवासाचे योगही जुळून येतील. मात्र, यश मिळवण्यासाठी मेहनत आणि कामावरील समर्पण तितकंच महत्त्वाचं ठरेल.
advertisement
मिथुन रास - मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग विशेष लाभदायी ठरणार आहे. करिअरमध्ये सकारात्मक बदल, प्रगती आणि नव्या संधी दिसून येतील. परदेशाशी संबंधित काम, शिक्षण किंवा प्रवासाची संधी मिळू शकते. आत्मविश्वास वाढल्यामुळे महत्त्वाचे निर्णय तुम्ही सहजपणे घेऊ शकाल. कार्यालयात तुमच्यावर अधिक जबाबदाऱ्या सोपवण्यात येण्याची शक्यता असून, त्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्यास मान-सन्मानातही वाढ होईल.


