बॉलिवूडचे 'ही-मॅन' ते 'कांटा लगा गर्ल', 2025 मध्ये या सेलिब्रिटींनी घेतली Exit! एका वर्षात इंडस्ट्री हादरली

Last Updated:
Bollywood Celebrities Died in 2025: पडदा असो वा रंगभूमी, किंवा मग संगीताचे जग, आपल्या कलागुणांनी कोट्यवधी लोकांच्या आयुष्यावर अमीट छाप सोडलेल्या अनेक कलाकारांनी 2025 मध्ये या जगातून एक्झिट घेतली.
1/11
मुंबई: सरत आलेलं २०२५ हे वर्ष बॉलिवूड आणि भारतीय मनोरंजन विश्वासाठी एकापाठोपाठ एक दुःखाचे धक्के घेऊन आले. पडदा असो वा रंगभूमी, किंवा मग संगीताचे जग, आपल्या कलागुणांनी कोट्यवधी लोकांच्या आयुष्यावर अमीट छाप सोडलेल्या अनेक कलाकारांनी या जगातून एक्झिट घेतली.

advertisement
2/11
त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबासोबतच संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. या वर्षात १५ हून अधिक सेलिब्रिटींनी जगाचा निरोप घेतला, ज्यांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम राहतील.

3/11
या वर्षी अनेक दिग्गज कलाकार आपल्याला सोडून गेले. या यादीत सर्वात मोठे नाव म्हणजे बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचे. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले, ज्यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली.

4/11
'भारत कुमार' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचेही ४ एप्रिल २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या देशभक्तीपर भूमिका नेहमीच स्मरणात राहिल्या आहेत.

5/11
अचूक कॉमिक टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेले आणि 'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम सतीश शाह यांचे २५ ऑक्टोबर २०२५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या जाण्याने विनोदाचा एक अध्याय संपला.

6/11
'शोले'मधील 'अंग्रेजों के जमाने के जेलर' या भूमिकेने गाजलेले असरानी यांनीही २० ऑक्टोबर २०२५ रोजी जगाचा निरोप घेतला.

7/11
'महाभारत' मालिकेत कर्णाची संस्मरणीय भूमिका साकारणारे पंकज धीर यांनी कर्करोगाशी दीर्घकाळ लढा दिला. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

8/11
मोठ्या पडद्यावरील कलाकारांसोबतच इतर क्षेत्रातील अनेक प्रतिभावान व्यक्तींनीही या वर्षात अखेरचा श्वास घेतला. 'कांटा लगा' गाण्याने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शेफाली जरीवालाला २७ जून २०२५ रोजी वयाच्या ४२ व्या वर्षी कार्डिॲक अरेस्ट आला.

9/11
तर आसामी, बंगाली आणि हिंदी संगीतात आपल्या सुमधुर आवाजाने जादू करणारा गायक जुबीन गर्ग यांचेही १९ सप्टेंबर २०२५ रोजी अकस्मात निधन झाले.

10/11
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दया डोंगरे यांचे ३ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे रंगभूमीवरील योगदान अविस्मरणीय राहील.

11/11
'थ्री इडियट्स' आणि 'लगे रहो मुन्नाभाई' मधील भूमिकांसाठी ओळखले जाणारे अच्युत पोद्दार यांचे १८ ऑगस्ट २०२५ रोजी आणि 'KGF' फेम कासिम चाचा अर्थात हरीश राय यांचे ६ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झाले.

Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement