Numerology: या जन्मतारखांच्या मुलींमध्ये उपजत असतो नेतृत्व गुण; अधिकारी बनून नाव कमावतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Women Numerology: अंकशास्त्रावरून एखाद्या व्यक्तीचं भविष्य वर्तवलं जातं. जन्मतारीख आणि अंकांची जुळवाजुळव करून अंकशास्त्राद्वारे भविष्य वर्तवलं जातं. एखाद्या तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असेल, त्यांचं करिअर कसं असेल याबद्दलही अंकशास्त्राद्वारे काही गोष्टी सांगता येतात.
advertisement
का ठरतात भाग्यवान - मूलांक 3 असलेल्या मुली खूप भाग्यवान असतात. त्या यशस्वी-आनंदी जीवन जगतात. तसंच या मुलींशी संबंधित लोकांसाठीही त्या भाग्यवान असतात. त्यांच्यामुळे त्यांच्याशी संबंधित असलेले लोकदेखील आनंदी आणि समृद्ध जीवन जगतात. या मुली इतरांसाठी प्रेरणा ठरतात. त्यांना न्यायाधीश, वकील यांसारख्या प्रशासकीय पदांवर आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठं यश मिळतं.
advertisement
नेतृत्व गुण - मूलांक 3 च्या मुलींमध्ये अप्रतिम नेतृत्व क्षमता असते. त्या खूप मेहनती, हुशार आणि दयाळू असतात. त्यांच्या या गुणांमुळे त्यांना लवकर यश मिळतं. या मुली ठरवलेलं काम पूर्ण करतातच. एकदा एखादं काम करायचं ठरवलं की, त्या ते यशस्वीरित्या पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही. त्यांच्या मेहनतीमुळे, कष्टांमुळे त्यांना त्यांच्या जीवनातील सर्व सुख-सुविधा आणि यश मिळतं.
advertisement
इतरांना मदत करण्यात असतात आघाडीवर मूलांक 3 असलेल्या मुली उत्तम आणि यशस्वी जीवन जगतात; पण त्या इतरांच्या भल्यासाठीही खूप काम करतात. त्या स्वत: लक्झरी लाइफ जगतात आणि आपल्या मित्रांसह कुटुंबावर खूप पैसा खर्च करतात. त्या खूप दयाळू असतात आणि इतरांना मदत करण्यात नेहमीच पुढे असतात. त्यांच्या या स्वभावामुळे त्या समाजात त्यांची वेगळी ओळख निर्माण करतात.
advertisement
advertisement