Numerology: 4, 13, 22, 31 या तारखांना जन्म झालाय? तुमच्यासाठी या अक्षरांनी सुरू होणारी नावे लकी ठरतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology: अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरून मूलांक संख्या काढली जाते. मूलांकावरून त्या माणसाच्या विविध गोष्टी जाणून घेता येतात. समजा तुमच्या मुलाचा किंवा कोणाचाही जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला असेल तर त्यांचा मूलांक 4 असेल. या मूलांकाला सुट होणाऱ्या अक्षराने सुरू होणारे नाव ठेवले किंवा बदलले तर त्याचा चांगला परिणाम होतो. मूलांकाशी सुसंगत नाव ठेवल्यास प्रगती आणि समृद्धी होण्यास मदत मिळते.
advertisement
अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 चा स्वामी ग्रह राहू आहे. राहूचे मन वेगाने काम करते कारण त्याला डोके असते आणि त्याचे धड केतू म्हणून ओळखले जाते. मूलांक 4 असलेले लोक चाणाक्ष बुद्धीचे असतात. ते इतरांपेक्षा वेगळे विचार करतात. त्यांच्याकडे प्रत्येक समस्येचे उत्तर असते. पण, ते थोडे हट्टी, व्यावहारिक आणि शिस्तबद्ध देखील असतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नावांमधील अशुभ अक्षरांसाठी उपाय - ज्यांची नावे अशुभ अक्षरांनी सुरू होतात त्यांच्यासाठी आता नाव बदलणे अशक्य आहे. तुम्ही तुमचे नाव दुरुस्त करण्यासाठी अंकशास्त्र तज्ञाचा सल्ला घेऊ शकता. ते काही अक्षरे जोडून किंवा वजा करून तुमचे सध्याचे नाव कसे वापरावे हे सांगू शकतात. नावाचे पहिले अक्षर महत्वाचे आहे, परंतु त्याचे एकूण मूल्य मूलांक आणि भाग्यांकाशी देखील जुळलं गेलं पाहिजे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


