Shani Nakshatra Parivartan: नवीन वर्षात शनीचं नक्षत्र परिवर्तन! या 3 राशींचा बँक बॅलन्स होणार तगडा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Nakshatra Parivartan : ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला कर्मफळ दाता आणि न्यायाचा स्वामी असे म्हटले जाते. शनीचे राशी परिवर्तन किंवा नक्षत्र बदलाचा सर्व राशींवर परिणाम होतो. प्रामाणिक संघर्ष केल्यावर शनिदेव लोकांना खूप चांगले फळ देतात. शनी महाराजांनी 24 नोव्हेंबर रोजी मित्र राहूच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश केला आहे. हे नक्षत्र कुंभ राशीच्या अंतर्गत येते आणि त्यावर राहुचे अधिराज्य आहे. शनिदेव 6 एप्रिल 2024 पर्यंत या स्थितीत कायम राहतील. यानंतर 6 एप्रिल रोजी दुपारी 3:55 वाजता शनी पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. शनिदेवाच्या या नक्षत्र बदलाने काही राशींचे नशीब पालटेल. जाणून घेऊया या भाग्यशाली राशींबद्दल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement