संकटं झेलायला अन् संघर्ष करायला तयार राहा! 2026 ते 2027 पर्यंत या राशींच्या मागे कडक शनि साडेसाती लागणार

Last Updated:
Astrology News : अवघ्या काही दिवसांत 2026 हे नवं वर्ष सुरू होणार आहे आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हे वर्ष अनेकांसाठी निर्णायक ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे.
1/6
astrology
अवघ्या काही दिवसांत 2026 हे नवं वर्ष सुरू होणार आहे आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हे वर्ष अनेकांसाठी निर्णायक ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. नववर्षात जवळपास सर्वच मुख्य ग्रह आपापल्या स्थितीत बदल करणार असून, त्याचा प्रभाव थेट 12 राशींवर दिसून येईल. विशेषतः कर्मफळ दाते मानले जाणारे शनिदेव 2026 मध्ये काही राशींवर कृपादृष्टी ठेवतील, तर काही राशींना साडेसातीच्या कठीण परीक्षेतून जावं लागणार आहे. ज्यांच्यावर शनीची साडेसाती सुरू आहे, त्यांच्यासाठी 2026 ते 2027 हा काळ संयम, शहाणपण आणि आत्मनियंत्रणाची खरी कसोटी पाहणारा ठरू शकतो.
advertisement
2/6
astrology
ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, या कालावधीत कामातील अडथळे, मानसिक दडपण, आर्थिक चढ-उतार तसेच नातेसंबंधांमधील गैरसमज वाढू शकतात. काही वेळा मेहनत करूनही अपेक्षित यश न मिळाल्याने निराशा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांनी घाईगडबडीत निर्णय न घेता शांतपणे आणि स्थिर मनाने प्रत्येक गोष्टीकडे पाहणं गरजेचं आहे. विशेषतः 2027 पर्यंत संयम बाळगला तर परिस्थिती हळूहळू अनुकूल होऊ शकते.
advertisement
3/6
मेष
<strong>मेष -</strong> मेष राशीच्या व्यक्तींसाठी 2026 पासून साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होत असल्याचं ज्योतिषशास्त्र सांगतं. त्यामुळे हा काळ शिकवण देणारा आणि आव्हानात्मक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी गैरसमज, वरिष्ठांशी मतभेद किंवा निर्णयांबाबत गोंधळ निर्माण होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित लाभ न मिळाल्याने चढ-उतारांना सामोरं जावं लागू शकतं. कौटुंबिक आयुष्यातही संयमाची गरज भासेल. कोणत्याही वादात न पडता शांत मार्ग स्वीकारावा. शनिवारी शनि मंदिरात दर्शन घेणं, काळ्या वस्तूंचं दान करणं हे उपाय मानसिक स्थैर्य देऊ शकतात.
advertisement
4/6
कुंभ
<strong>कुंभ -</strong> कुंभ राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा 2026 मध्ये सक्रिय राहील. हा टप्पा थोडासा तणावपूर्ण असला तरी भविष्यासाठी दिशा देणारा मानला जातो. नोकरीत जबाबदाऱ्यांमध्ये बदल, कामाचा ताण किंवा अपेक्षित परिणाम न मिळाल्याने अस्वस्थता वाढू शकते. अनावश्यक खर्च वाढल्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलण्यात आणि वागण्यात संयम ठेवा. शनिवारी उपवास किंवा शनि स्तोत्राचे पठण केल्यास मनोबल वाढू शकते.
advertisement
5/6
astrology
<strong>मीन -</strong> मीन राशीच्या व्यक्तींसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा 2026 मध्ये प्रभावी राहणार आहे. हा काळ नातेसंबंधांची परीक्षा पाहणारा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी किंवा घरात गैरसमज, भावनिक ताण जाणवू शकतो. अचानक मोठे खर्च वाढल्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात जोखीम असलेली गुंतवणूक, विशेषतः शेअर बाजार टाळलेला बरा. व्यवसाय करणाऱ्यांनी कामात शिस्त आणि वेळेचं पालन केल्यास नुकसान टाळता येईल. शनिवारी शनिदेवाला मोहरीचं तेल अर्पण केल्यास मनःशांती लाभेल.
advertisement
6/6
astrology news
<strong>(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही.) </strong>
advertisement
Mahayuti : शिंदे गट–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे मोठ्या घडामोडी, महायुतीचा महापालिकेचा फॉर्म्युला ठरला
शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर
  • शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर

  • शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर

  • शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर

View All
advertisement