कमल हासनची हिरोईन, 9 वर्षांपासून इंडस्ट्रीतून गायब; भारतही सोडला, गेली कुठे?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
कमल हासनच्या सुपरहिट चित्रपटात काम करणारी अभिनेत्री जी गेल्या 9 वर्षांपासून इंडस्ट्रीपासून दूर आहे. अभिनेत्रीनं भारतही सोडला आहे. आता गेली कुठे?
प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या आणि त्यांच्या पहिल्या चित्रपटात दमदार अभिनय करणाऱ्या अभिनेत्री अनेकदा विविध कारणांमुळे चित्रपटसृष्टी सोडून जातात. त्या पुन्हा सिनेमात दिसतील का असा प्रश्न अनेकांना पडतो. चाहते अभिनेत्रीच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहत असतात. या अभिनेत्री जेव्हा अनेक वर्षांनी प्रेक्षकांसमोर येतात तेव्हा त्यांच्याकडे पाहून विश्वास बसत नाही. त्यांना ओळखणं कठिण होतं.
advertisement
advertisement
या अभिनेत्रीनं 2006 साली गौतम वासुदेव मेनन दिग्दर्शित 'वेत्तैयादु वैद्यदु' या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून तमिळ चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. या सिनेमात तिच्याबरोबर अभिनेते कमल हासन प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. 'पार्थ मुथला नाले' हे गाणे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या गाण्यामुळे ही अभिनेत्री तमिळ चाहत्यांमध्ये घराघरात लोकप्रिय झाली.
advertisement
आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय की अभिनेत्री म्हणजेच कमलिनी. तिने नागार्जुन, पवन कल्याण आणि राम चरण यांच्यासोबत 'गोदावरी', 'क्लासमेट', 'हॅपी डेज' आणि 'जलसा' या तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं. तिने मल्याळम चित्रपट 'कुट्टी शारंगू' द्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तिनं तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि हिंदीसह विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement











