Surya Grahan 2025: वाईट बातमीनं टेन्शनमध्ये! शनि-सूर्याच्या समसप्तक योगामुळे 4 राशींवर संकटाचे ढग

Last Updated:
Surya Grahan 2025 : 2025 मधील शेवटचे सूर्यग्रहण आज 21 सप्टेंबर रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण कन्या राशीत होणार आहे आणि या काळात सूर्य आणि शनि यांच्यात समसप्तक योग देखील होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि शनि यांचे संबंध चांगले मानले जात नाहीत, त्यामुळे या ग्रहणानंतर काही राशींना अडचणींना तोंड द्यावं लागू शकतं. 
1/5
काही राशीच्या लोकांना करिअर, आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये चढ-उतार येऊ शकतात. या ग्रहणाचा काही राशींवर कसा परिणाम होईल, त्यांनी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत जाणून घेऊ. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.

advertisement
2/5
मेष : या सूर्यग्रहणादरम्यान मेष राशीच्या लोकांना आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. ग्रहण मेष राशीच्या सहाव्या घरात आहे आणि मेष राशीला साडेसातीदेखील आहे. त्यामुळे कामात अडचणी आणि नातेसंबंधांमध्ये तणाव येऊ शकतो. मोठे वाद देखील उद्भवू शकतात. तुम्ही कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेण्याचा विचार करत असाल तर ते सध्यासाठी पुढे ढकला. तुमच्या योजनांचे पुनर्मूल्यांकन करा, या काळात सावधगिरी बाळगा.

3/5
सिंह: सिंह राशीसाठी हे सूर्यग्रहण दुसऱ्या घरात होत आहे. तुमच्या राशीचा स्वामी सूर्य हा ग्रहणामुळे पीडित असेल, ज्यामुळे तुमच्या करिअर आणि कामाच्या ठिकाणी आव्हाने वाढतील. सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. पालक किंवा कुटुंबातील सदस्यांशी संबंध थोडे ताणले जाऊ शकतात. या काळात तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

4/5
कन्या: कन्या राशीत सूर्यग्रहण होत आहे. राशीचा स्वामी बुध देखील तुमच्या राशीत आहे, त्यामुळे परिस्थिती मिश्रित असेल. कौटुंबिक बाबींमध्ये काही चढ-उतार दिसू शकतात. जवळच्या लोकांशी संबंध ताणले जाऊ शकतात. तथापि, तुम्ही तुमच्या समजुतीने आणि संयमाने या समस्या सोडवाल. तुमच्या वर्तनात संयम ठेवा आणि कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका.

5/5
कुंभ: कठोर परिश्रम करूनही फळ मिळणार नाही. कुंभ राशीसाठी हे ग्रहण आठव्या घरात होत आहे आणि राहू देखील तुमच्या राशीत आहे. या काळात तुम्हाला करिअरमध्ये आव्हानांना सामोरे जावे लागेल. तुमच्या कष्टाचे फळ पूर्णपणे न मिळाल्याने निराशा येऊ शकते. घरी आणि कामाच्या ठिकाणी तुम्हाला विरोध होऊ शकतो. पोट आणि आरोग्याच्या समस्याही कायम राहू शकतात. या काळात संयम आणि सावधगिरीने काम करणे महत्त्वाचे आहे. 
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement