SUV: दिवाळीला कार नाही आता 7 सीटर SUV आणा! 5 अशा फॅमिली एसयूव्ही, मायलेज आणि किंमतीला तोड नाही!
- Published by:Sachin S
Last Updated:
एवढंच नाहीतर फॅमिलीसाठी 7 सीटर एसयूव्ही सुद्धा आता बजेटमध्ये आल्या आहे. जर तुम्ही दिवाळीला एक फॅमिली एसयूव्ही खरेदीचा प्लॅन करत असाल तर हीच ती संधी आहे.
[caption id="attachment_1500324" align="alignnone" width="750"] दिवाळी सण आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सगळीकडे खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. अशातच जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे ऑटो इंडस्ट्रीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कारच्या किंमत कमी झाल्या आहेत. एवढंच नाहीतर फॅमिलीसाठी 7 सीटर एसयूव्ही सुद्धा आता बजेटमध्ये आल्या आहे. जर तुम्ही दिवाळीला एक फॅमिली एसयूव्ही खरेदीचा प्लॅन करत असाल तर हीच ती संधी आहे.</dd>
<dd>[/caption]
advertisement
1. Renault Triber - सगळ्यात पहिल्यानंबरवर येते रेनॉल्ट ट्रायबर. Renault Triber ही भारतातील सर्वात परवडणारी 7-सीटर एसयूव्ही आहे. या एसयूव्हीमध्ये तीन रांगा मिळतात. मधल्या रांगेतील जागा 60:40 मध्ये फोल्ड आणि सरकवता येते. बॅक रेस्टचा कोन (Angle) देखील हलवता येतो. दुसरी रांग पुढे फोल्ड केल्यानंतर शेवटच्या रांगेत सहजपणे जाता येतं. जास्त सामान ठेवण्यासाठी शेवटची रांग पूर्णपणे काढता येते. मधल्या आणि शेवटच्या दोन्ही रांगेतील प्रवाशांसाठी AC व्हेंट्स चांगले आहेत. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्ससह 1.0-लीटर पेट्रोल इंजिन आहे.
advertisement
[caption id="attachment_1497562" align="alignnone" width="750"] Mahindra Bolero महिंद्रा बोलेरो ही महिंद्रांची मजबूत आणि धाकड अशी एसयूव्ही आहे. अलीकडेच शहरीभागासाठी ब्लॅक रंगात व्हेरिएंट महिंद्राने लाँच केलं आहे. Mahindra Bolero ही सर्वात उपयुक्त 7-सीटर आहे. यात अलॉय व्हील्स, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, लेदरच्या सीट्स आणि मागील AC व्हेंट्स सारखे फिचर्स आहेत, पण, याची फिटिंग आणि फिनिशिंग आधुनिक एसयूव्हीपेक्षा थोडी कमी आहे. ही एसयूव्ही 1.5-लीटर 76hp डिझेल इंजिन आणि मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. या एसयूव्हीची किंमत 7.99 लाखांपासून सुरू होते ती 9.69 लाख रुपयांपर्यंत आहे.</dd>
<dd>[/caption]
advertisement
Mahindra Bolero Neo - Bolero Neo ही Bolero पेक्षा चांगली आणि अधिक आधुनिक (Modern) दिसते. 2025 Mahindra Bolero Neo मध्ये बरेच अपडेट केले आहे. यामध्ये मागील निओचं इंजिन आहे. यामध्ये 1.5-लीटर mHawk डिझेल इंजिन दिलं आहे. जे 100 बीएचपीची पॉवर आणि 260 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतो. महिंद्राने इतर एसयूव्हीमध्ये जे आरामदार फिचर्स दिले आहे, तेच फिचर्स आता Mahindra Bolero Neo 2025 आणि बोलेरोमध्ये अपडेट केले आहे. विशेष, म्हणजे या दोन्ही गाड्यांच्या किंमती या १० लाखांच्या आतच आहे. बोलेरोची किंमत ७.९९ लाख (अंदाजे ७.९९ लाख रुपये) आहे. तर Bolero Neo ची किंमत ८.४९ लाखांपासून सुरू होते.
advertisement
Maruti Eeco - मारुतीची ही ७ सीटर एसयूव्ही फॅमिलीची नेहमी फेव्हरेट ठरली आहे. या एसयूव्हीमध्ये 5 किंवा 6 प्रवासी बसू शकतात. या एसयूव्हीमध्ये आता ६-एअरबॅग्ज मिळतील.पेट्रोल मॉडेलचा मायलेज 19.71 kmpl आहे, तर CNG व्हर्जन 26.78 km/kg मायलेज देते. सुरक्षिततेसाठी यात ड्युअल एअरबॅग्ज, ABS आणि मागील पार्किंग सेन्सर दिले आहेत. Eeco मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते आणि काही व्हेरिअंटमध्ये CNG पर्याय देखील आहे. सध्या, मारुती इकोची किंमत मुंबईत ६.४१ लाख ते ७.४८ लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
advertisement
Maruti Ertiga - मारुती सुझुकीची लोकप्रिय Ertiga ही सर्वसामान्य ग्राहकांची पहिली पसंती ठरली आहे. लूक आणि मायलेजमध्ये ही एसयूव्ही बेस्ट अशीच आहे. किफायती 7-सीटर एसयुव्हीपैकी एक आहे. यात मोठे उघडणारे दरवाजे, आरामदायक पुढील आणि मधल्या जागा आहेत. AC व्हेंट्स आणि Type-C चार्जिंग पोर्ट्स देखील उपलब्ध आहेत. यात 103hp, 1.5-लीटर पेट्रोल इंजिन असून मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स चे पर्याय आहेत, तसेच काही व्हेरिअंटमध्ये CNG किट देखील आहे. मारुती सुझुकी अर्टिगाची सध्याची एक्स-शोरूम किंमत भारतात 8.80 लाख रुपये पासून सुरू होऊन 12.94 लाख रुपये पर्यंत आहे.