BYD: 410 किमी कुठेही फिरा, 30 मिनिटांत होईल फुल चार्ज, Tata, Mahindra ला टक्कर द्यायला आली नवी SUV
- Published by:Sachin S
Last Updated:
चीनची फेमस इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी BYD ने आता आपली सगळ्यात स्वस्तात मस्त अशी इलेक्ट्रिक एसयूव्ही 'Atto 2' लाँच केली आहे.
सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांनी चांगलीच भाऊ गर्दी केली आहे. एकापेक्षा एक दुचाकी आणि कार लाँच झाल्या आहेत. अशातच आता चीनची फेमस इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी BYD ने आता आपली सगळ्यात स्वस्तात मस्त अशी इलेक्ट्रिक एसयूव्ही 'Atto 2' लाँच केली आहे. विशेष म्हणजे, ही एसयूव्ही भारतात लाँच केली असून दिल्लीच्या रस्त्यावर चाचणी सुरू आहे. या कारमध्ये सर्वात लवकर चार्ज होण्याचं फिचर दिलं आहे.
advertisement
BYD ने Atto 2 ला यूकेमध्ये लाँच केलं आहे. यूकेमध्ये तिच्या 'बेस बूस्ट' मॉडेलची सुरुवातीची किंमत सुमारे 32.5 लाख रुपये इतकी आहे. तर 'हाय-एन्ड कम्फर्ट' मॉडेलची किंमत सुमारे 41.3 लाख रुपये आहे. आतापर्यंत BYD मुख्यत्वे लक्झरी इलेक्ट्रिक गाड्यांवर लक्ष केंद्रित करत होती, पण Atto 2 च्या लाँचमुळे कंपनीने आपल्या धोरणात बदल केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
30 मिनिटांत 80% चार्ज - बूस्ट मॉडेल 82kW DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, ज्यामुळे बॅटरी 30 मिनिटांत 30% वरून 80% पर्यंत चार्ज होते. कम्फर्ट मॉडेल मध्ये 155kW चार्जिंग सिस्टम आहे, ज्यामुळे चार्जिंगचा वेळ फक्त 21 मिनिटांपर्यंत कमी होतो. दोन्ही मॉडेल्समध्ये BYD ची खास 'ब्लेड बॅटरी' तंत्रज्ञान वापरलं आहे.


