Maruti Dzire 2024: किती व्हेरिएंटमध्ये मिळणार ही कार? पाहा यांच्या किंमती किती
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
New Dzire Variant Price:मारुती सुझुकीने भारतीय बाजारात 2024 Dzire सेडान लॉन्च केली आहे. मारुतीने अपडेटेड डिझाइन आणि अनेक नवीन फीचर्ससह नवीन Dezire लॉन्च केली आहे. यासोबतच या कारला ग्लोबल NCAP कडून 5-स्टारचे उत्कृष्ट सेफ्टी रेटिंग देखील मिळाले आहे. New Dezire एकूण 4 व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आलीये. कोणत्या व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत किती(Dzire Variants Price) आहे ते पाहूया.
advertisement
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन Dezire मध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT ट्रान्समिशन ऑप्शन देण्यात आले आहेत. यातील चारही व्हेरिएंटमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन दिले जाईल. परंतु एजीएस/एएमटी ट्रान्समिशन फक्त तीन व्हेरिएंटमध्ये दिले जाते. Dzire च्या बेस व्हेरिएंट LXI मध्ये फक्त 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. तर त्याच्या इतर व्हेरियंटमध्ये दोन्ही ट्रान्समिशन ऑप्शन दिले आहेत.
advertisement
advertisement
नवीन जेनरेशन मारुती डिझायरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.79 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. जी त्याच्या LXI व्हेरिएंटसाठी आहे. यानंतर VXI प्रकार येतो, ज्याची एक्स-शोरूम किंमत 7.79 लाख रुपये (पेट्रोल मॅन्युअल) निश्चित करण्यात आली आहे. VXI प्रकाराचा पेट्रोल AGS व्हेरिएंट 8.24 लाख रुपये आणि CNG मॅन्युअल व्हेरिएंट 8.74 लाख रुपयांना उपलब्ध आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नवीन मारुती डिझायर ही कंपनीची पहिली कार आहे. जिला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. या कारने एडल्ट प्रोटेक्शनमध्ये 5-स्टार रेटिंग आणि चाइल्ड प्रोटेक्शनमध्ये 4-स्टार रेटिंग मिळवली आहे. ग्लोबल NCAP मध्ये 5-स्टार रेटिंग मिळवणारी ही मारुतीची पहिली कार आहे. हे मॉडेल ड्रायव्हर आणि प्रवाशांसाठी चांगल्या सुरक्षिततेचा दावा करते, तर साइड इफेक्ट टेस्टमध्येही देखील चांगले परिणाम दिसून आले.