Hero आता Honda ला देणार टक्कर, आणली नवीन दमदार बाइक, किंमत फक्त 90 हजार!
- Published by:Sachin S
Last Updated:
सध्या 125 सीसी सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा आहे. होंडाने अलीकडे आपली SP 125 नव्याने लाँच केली आहे. भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरोनं आता पुन्हा एकदा नवीन दुचाकी लाँच केली आहे.
advertisement
आता हिराे मोटर्सने आपली फेमस हिरो ग्लॅमर एक्स 125 लाँच केली आहे. या बाइकची किंमत फक्त 90,000 रुपये (एक्स-शोरूम) (बेस ड्रम व्हेरिएंट) ठेवली आहे. या बाइकचं टॉप मॉडेल जे स्पेक डिस्क व्हर्जन आहे त्याची किंमत 1 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे. या नव्या बाइकमध्ये स्टायलिंग आणि नवीन फिचर्स दिले आहे.
advertisement
Hero Glamour X 125 मध्ये सगळ्यात मोठा बदल म्हणजे, १२५ सीसी सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच क्रूज कंट्रोल फिचर दिलं आहे. हे फिचर KTM 390 Duke, TVS Apache RTR 310 सारख्या प्रीमियम परफॉर्मेन्स बाइकमध्ये पाहण्यास मिळलं. या बाइकमध्ये क्रूज कंट्रोल सिस्टिम दिलं असून सुरू करण्यासाठी एक टॉगल स्विच दिलं असतं ज्यामुळे बाइकची स्पीड कमी जास्त आणि रिसेट करण्याचं ऑप्शन सुद्धा मिळतं. या बाइकमध्ये राइड-बाय-वायर थ्रॉटल आणि ३ रायड मोड: इको, रोड आणि पॉवर दिले आहे. जो मोड तुम्ही सेट केला त्यावर इंजिन पुढे परफॉर्म करत असतो.
advertisement
Hero Glamour X 125 मध्ये नवीन काय? - नवी Hero Glamour X 125 मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसह कलर TFT इंस्ट्रूमेंट क्लस्टर सुद्धा दिलं आहे. यामध्ये फुल-एलईडी लायटिंग, युएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टमचा समावेश केला आहे. डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर ग्लॅमर एक्स 125 मध्ये बरेच बदल केले आहे, नवीन टँक कव्हर आणि एक दमदार असं फ्रंट हेड दिलं आहे, त्यामुळे या बाइकला आणखी स्पोर्टी आणि शार्प लूक आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement