पगार असू द्या कमी पण ऑफिसला जा कारनेच! Maruti ची 24 किमी मायलेजदार Car, EMI सगळ्यात कमी
- Published by:Sachin S
Last Updated:
ज्या एसयूव्ही आधी महाग होत्या त्या आता कारच्या किंमतीत उपलब्ध झाल्या आहेत. कारच्या किंमती या एखाद्या बाईक इतकी झाली आहे.
जीएसटीच्या दरात कपात झाल्यानंतर ऑटो इंडस्ट्रीमध्ये स्वस्ताईची लाट आली आहे. ज्या एसयूव्ही आधी महाग होत्या त्या आता कारच्या किंमतीत उपलब्ध झाल्या आहेत. कारच्या किंमती या एखाद्या बाईक इतकी झाली आहे. अशातच भारतातील सर्वात मोठा वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या गाड्यांच्या किंमतीत कमालीची कपात केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Maruti WagonR चं इंजिन आणि मायलेज - Maruti Wagon R तीन पॉवरट्रेन पर्यायांमध्ये येते, ज्यात 1.0-लीटर पेट्रोल इंजिन, 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आणि CNG वेरिएंटचा समावेश आहे. याचे CNG वेरिएंट 24 km/kg पर्यंत मायलेज देतं. यामुळेच ही कार मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आणि रोजचा लांबचा प्रवास करणाऱ्या लोकांसाठी सर्वात किफायतशीर पर्याय मानली जाते.
advertisement
advertisement
advertisement
Maruti Wagon R ची स्पर्धा Tata Tiago, Hyundai Exter, Renault Kwid आणि Maruti Suzuki Swift या कार्सशी आहे. नुकतीच Tata Tiago च्या किमतीत सध्या 75,000 पर्यंतची कपात झाली असून, आता ही कार आता 4.57 लाख एक्स-शोरूम किंमतीपासून सुरू होते. अशा परिस्थितीत ग्राहकांसाठी परवडणाऱ्या कार सेगमेंटमधील पर्याय आणखी वाढले आहेत.