HSRP नंबर प्लेट न लावणाऱ्या त्या 70 टक्के लोकांवर काय होणार कारवाई? सरकारकडून नवीन अपडेट
- Published by:Sachin S
Last Updated:
महाराष्ट्रामध्ये सर्वच वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (High Security Registration Plate
) लावण्याबद्दल आदेश काढण्यात आला होता.
महाराष्ट्रामध्ये सर्वच वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (High Security Registration Plate ) लावण्याबद्दल आदेश काढण्यात आला होता. मागील तीन महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू होती. पण अजूनही अनेक वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट लावल्या नाहीत. जवळपास ही संख्या ७० टक्के आहे. मात्र, आता महाराष्ट्र सरकारने HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ७० टक्के लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
advertisement
राज्यात सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) लावणाऱ्यांची टक्केवारी अतिशय मोजकी आहे. आतापर्यंत २० टक्के वाहनांनाच एचएसआरपी पाटी लागली आहे. तसेच १० टक्के वाहनधारकांनी पाटी लावण्यासाठी वेळ घेतली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुन्या वाहनांपैकी अजूनही ७० टक्के वाहनधारकांनी एचएसआरपी पाटी लावली नसल्याचे सांगितले जाते.
advertisement
advertisement
वाहन मालकांनी वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अपॉईंटमेंट घ्यावी. त्यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) न बसविणाऱ्या वाहनांवर १ डिसेंबर २०२५ नंतर वायुवेग पथकाद्वारे नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे.
advertisement
advertisement
advertisement