Vladimir Putin Limousine: गोळीबार तर दूरच बॉम्ब हल्ल्यानंही काही होत नाही पुतीन यांच्या कारला! तुम्ही सुद्धा घेऊ शकता, पण...
- Published by:Sachin S
Last Updated:
पुतीन यांची aurus senat limousine ही कार कोणत्याही टँकरपेक्षा कमी नाही. पुतीन यांची कारही अभेद्द अशीच आहे. या कारवर कोणताही बॉम्ब हल्ला केला तरी काही होत नाही. ही कार राष्ट्रपती पुतीन यांच्या सुरक्षेची शान आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापाठोपाठ जगातील सर्वात कडक सुरक्षा असते ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन. व्लादिमीर पुतीन ज्या कोणत्या देशाचा दौरा करता त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा खास सुरक्षा ताफा असतो. या ताफ्यामध्ये कोणत्याही हल्ल्यापासून रोखण्यासाठी यंत्रणा आणि जवान सज्ज असतात. या ताफ्यामध्ये सर्वात महत्त्वाची आहे ती पुतिन यांची कार अर्थात लिमोजिन अरुस सीनेट (aurus senat limousine).
advertisement
advertisement
advertisement
अल्ट्रा-लक्झरी लिमोजिन: aurus senat limousine मध्ये हाय लेव्हलची सुरक्षा प्रणाली आहे. ही कार रोल्स-रॉयस आणि बेंटली सारख्या वाहनांना टक्कर देते. तसंच पुतीन यांची aurus senat limousine ही कार जगातील सर्वात सुरक्षित कार आहे. या कारमध्ये VR10 सेफ्टी मानक सुरक्षेनं सज्ज आहे. याचा अर्थ असा की ही कार, कोणताही गंभीर बॅलिस्टिक हल्ला सहन करू शकते.
advertisement
बुलेटप्रूफ मल्टी-लेअर कवच: aurus senat limousine ची पूर्ण बॉडी ही मल्टी-लेअर लोखंडाने झाकलेली आहे. जी एक हाय-कॅलिबर रायफलच्या गोळीचा सुद्धा सामना करू शकते. तसंच aurus senat limousine मध्ये खालच्या बाजूला एक फ्यूल टँक दिला आहे, तो एका लोखंडी प्लेटने झाकलेला आहे. जर या कारवर कुणी ग्रेनेड आणि IED हल्ला केला तरी स्फोटामुळे कारला काहीच होणार नाही.
advertisement
लाइफ सपोर्ट आणि एयर फिल्ट्रेशन सिस्टम: पुतीन यांच्या aurus senat limousine कारवर जर कुणी रासायनिक हल्ला केला तर या कारमध्ये अत्याधुनिक एअर फिल्ट्रेशन सिस्टम दिली आहे. जी अशावेळी ऑक्सिजनचा पुरवठा करते. एवढंच नाहीतर पुतीन यांच्या कारमध्ये aurus senat limousine खास प्रकारचे टायर दिले आहे. जे सेल्फ सीलिंगने झाकलेले आहे. जर कुणी गोळीबार केला आणि टायर पंक्चर केलं तरी कार थांबणार नाही. टायरमध्ये आपोआप हवेचं प्रेशर संतुलित केलं जाईल, आणि कार तशीच पुढे जाईल.
advertisement
पॉवरफुल V8 हायब्रिड इंजिन: aurus senat limousine मध्ये 4.4 लीटरचं ट्विन-टर्बो V8 हायब्रिड इंजिन दिलं आहे. जे 598 BHP इतकी जबरदस्त पॉवर जनरेट करते तर 880 Nm मीटर इतकाा टॉर्क जनरेट करतो. त्यामुळे कार ही भक्कम जरी असली तरी कारची स्पीड काही कमी नाही. अवघ्या 6 सेकंदात ही कार 0 ते 100 किमी प्रति तास इतका वेग गाठते. त्याामुळे एखाद्या पेच प्रसंगी घटनास्थळावरून लगेच बाहेर पडण्यास मदत होते.
advertisement
advertisement
advertisement


