UPSC मध्ये या सुंदर तरुणीनं मारली बाजी, बॅडमिंटनमध्येही भारताचं नाव गाजवलं! PHOTOS
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
16 एप्रिलला UPSC 2023चा निकाल जाहीर झाला आणि सर्वत्र एकच जल्लोष झाला. या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला आदित्य श्रीवास्तव यानं. तर या परीक्षेत मुलींनीही मोठ्या संख्येनं बाजी मारली. उत्तराखंडचे माजी डीजीपी अशोक कुमार यांची मुलगी कुहू गर्ग हिनं या परीक्षेत 178वा क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे कुहूनं बॅडमिंटन खेळात अनेकदा भारताचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. मग ती UPSC कडे कशी वळली यामागची कहाणी रोमांचक आहे. तिचे वडील या क्षेत्रात होते म्हणून तिनं परीक्षा दिली हे कारण अजिबात नाहीये, तर तिला मिळालेली प्रेरणा यापेक्षाही मोठी आहे.
advertisement
कुहू गर्गच्या नावे आतापर्यंत 17 मेडल आणि अनेक किताब आहेत. आता ती <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/know-about-this-five-top-ias-ips-officers-property-you-will-be-shocked-l18w-mhkd-1155024.html">आयपीएस</a> अधिकारी होऊन आपल्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवणार आहे. तिच्या वडिलांनी सोशल मीडियावरून लेकीचं भरभरून कौतुक केलंय. या यशासाठी तिनं नेमकी कशी मेहनत घेतली, याबाबत त्यांनी काय म्हटलंय, पाहूया. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
advertisement
अशोक कुमार यांनी एक्सवर आपल्या मुलीला शुभेच्छा देताना म्हटलंय, आज संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण आहे. जाहीर झालेल्या UPSC निकालात 178वा क्रमांक मिळवून माझी मुलगी कुहू गर्ग <a href="https://news18marathi.com/career/how-to-prepare-upsc-csat-syllabus-know-secrets-from-ias-kritika-mishra-gh-mhpp-1145430.html">IPS</a>साठी सिलेक्ट झाली. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
advertisement
अशोक कुमार यांनी लिहिलंय की, कुहू ही आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू आहे. तिनं वयाच्या नवव्या वर्षी खेळायला सुरुवात केली. 56 राष्ट्रीय आणि 19 आंतरराष्ट्रीय पदकं पटकावली. Mixed doubles मध्ये तिचा वर्ल्ड रँक 34 होता. ती 2018 साली वर्ल्ड चॅम्पियनशिपची क्वार्टर फायनलसुद्धा खेळली होती. कोरोना काळात मात्र तिचा खेळ थाबंला. याचदरम्यान तिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर वर्षभर तिला खेळता आलं नाही. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
advertisement
लहानपणापासून एवढी खेळण्याची आवड असूनही आता खेळता येणार नाही म्हणून कुहू थांबली नाही, तिनं हार मानली नाही. आता तिनं स्पर्धा परीक्षा द्यायचं ठरवलं, तिनं मोठ्या जिद्दीनं अभ्यासाला सुरूवात केली. सर्वात मोठी गोष्ट हीच आहे की, 6 वर्षे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळणारी आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये क्वार्टर फायनल खेळणारी कुहू ही <a href="https://news18marathi.com/photogallery/viral/upsc-result-2023-srishti-dabas-got-the-6th-rank-know-her-full-success-story-l18w-mhij-1164384.html">IAS</a>/IPS होणारी पहिलीच खेळाडू आहे, असं तिच्या वडिलांनी म्हटलंय. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)


