90s चा फेमस कॉमेडी शो, फक्त 13 एपिसोडने रचला इतिहास, आजही युट्यूबवर आवडीने पाहतात लोक

Last Updated:
India Most Famous TV Show : 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो आजही युट्यूबवर आवडीने पाहिला जातो. या शोचे एकूण 13 एपिसोड आहेत.
1/7
 90 च्या दशकात खूप कमी टीव्ही चॅनल्स होते. पण दमदार कथानक, तगडी स्टारकास्ट अशा अनेक गोष्टींमुळे त्यावेळचे कार्यक्रम प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत होते. 90 च्या दशकातील एक हल्का-फुल्का कॉमेडी शोने प्रेक्षकांना चांगलच हसवलं. लोककथांवर आधारित असलेला हा शो आजही युट्यूबवर उपलब्ध आहे.

advertisement
2/7
 युट्यूबवरील या कॉमेडी शोमध्ये कोणत्याही दिखाव्यापेक्षा इमोशन्स दाखवण्यात आले आहे. या शोमधील डायलॉग आणि कॉमेडी प्रेक्षकांच्या मनावर चांगलच राज्य करते. या शोमधील प्रत्येक एपिसोड प्रेक्षकांना फक्त हसवत नाही तर आयुष्यातील छोट्या-छोट्या मुद्द्यांवर प्रकाश टाकतो.

3/7
 साधा सेट आणि मध्यमवर्गीय लोकांनी या कॉमेडी शोला आणखी खास बनवलं आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबियांसोबत हा शो पाहण्याची मजा वेगळीच आहे. आजही साधेपणामुळे हा शो ओळखला जातो.

4/7
 1990 मध्ये दूरदर्शनवर हा शो सुरू झाला होता. अमल अल्लाना यांनी या शोचं दिग्दर्शन केलं होतं. तर एस.एम. मेहदी यांनी पटकथा लिहिली होती. लुई बँक्स यांनी म्यूझिक केलं होतं. एकंदरीत सामाजिक कॉमेडी असणारा हा शो होता. प्रेक्षकांना सहजरित्या कळेल अशी भाषा या शोमध्ये होती. 'मुल्ला नसरुद्दीन' असं या शोचं नाव आहे.

5/7
 'मुल्ला नसरुद्दीन' या शोमध्ये रघुबीर यादव मुख्य भूमिकेत होते. त्यांनी मुल्ला नसरुद्दीन यांच्या पात्राला योग्य न्याय दिला होता. मनोजर सिंह, सौरभ शुक्ला, समिना मिश्रा, विजय कश्यप, युसूफ हुसैन या शोमध्ये मुख्य भूमिकेत होते. प्रत्येक कलाकाराने आपल्या सटल अभिनयाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

6/7
 35 वर्षांपूर्वी आलेल्या या शोमध्ये एकूण 13 एपिसोड होते. प्रत्येक एपिसोडमध्ये एक वेगळी गोष्ट दाखवण्यात आली होती. मुल्ला नसरुद्दीन गावातील लोकांच्या समस्या या शोमध्ये वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आल्या होत्या. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत त्यांना विचार करायला भाग पाडणारा हा शो होता.

7/7
 'मुल्ला नसरुद्दीन'या शोला IMDB वर 8.9 रेटिंग मिळाले आहे. प्रेक्षकांना या शोचं कथानक, सादरीकरण आणि अभिनय चांगलाच पसंतीस उतरला होता. आजही तुम्ही तुमच्या कुटुंबियांसमवेत हा शो पाहू शकता.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement