'तिच्या आईने तिला शिकवलंय...' ऐश्वर्यासोबत डिवोर्सच्या चर्चा, अभिषेकनं सांगितलं काय असते लेक आराध्याची रिअॅक्शन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या डिवोर्सच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. सोशल मीडियावर त्यांच्याविषयी अनेक गोष्टी लिहिण्यात आल्यात. या सगळ्या गोष्टी जेव्हा आराध्या पाहते तेव्हा तिची काय प्रतिक्रिया असते?
advertisement
ऐश्वर्यानं बच्चन कुटुंबाचं घर सोडलं ते दोघांनी कोर्टात डिवोर्स फाइल केला आहे इथपर्यंत अनेक चर्चा सुरू होत्या. मात्र ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी यावर भाष्य केलेलं नाही. दरम्यान अभिषेकनं एका मुलाखतीत बोलताना चर्चा करण्यांना झापलं होतं. पण त्यानंतर दोघांनीही कधीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा केली नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आराध्याकडे मोबाईल नसल्याचंही अभिषेकनं सांगितलं. तो म्हणाला, "ती फक्त 14 वर्षांची आहे. तिच्याकडे फोन नाही. तिला तिच्या मित्र मैत्रिणींना फोन करायचा असेल तर ती तिच्या आईचा फोन वापरते. हे आम्ही आधीच ठरवलं होतं. तिच्यासाठी इंटरनेट सुविधा आहे पण ती त्याचा वापर तिच्या अभ्यासासाठी आणि रिसर्चसाठी करते. तिला शाळेत जायला खूप आवडतं."
advertisement
आराध्या जर इंटरनेट वापरते तर तिला तिच्या आई-वडिलांबद्दल सुरू असलेल्या अफवा देखील ऐकायला मिळत असतील, हे ऐकून ती अस्वस्थ होत नाही? असा प्रश्न विचारला असता अभिषेक म्हणाला, "मला नाही वाटत ती असं करत असेल. तिला या गोष्टींमध्ये अजिबात इंटेरेस्ट नाहीये. तिला तिच्या आईने शिकवलं आहे की वाचलेल्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही."
advertisement
advertisement








