Amitabh Bachchan : आते हैं! अमिताभ बच्चन यांचे धडाधड 3 ट्वीट, चाहत्यांची चिंता वाढली
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आज वयाच्या 83 व्या वर्षीही सोशल मीडियावर सक्रीय आहेत. पण सध्या धडाधड तीन ट्वीट केल्याने ते चर्चेत आले आहेत. त्यांच्या या ट्वीटमुळे नेटिझन्सची चिंता वाढली आहे.
advertisement
अमिताभ बच्चन गेल्या काही दिवसांपासून आपल्या ब्लॉग आणि ट्वीटच्या माध्यमातून चाहत्यांना धक्के देत आहेत. कधी मध्यरात्री तर कधी पहाटे ते ट्वीट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. पण अमिताभ बच्चन यांनी नुकतच केलेल्या तीन ट्वीटचा अर्थ नेमका काय आहे? हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. चाहते आणि नेटिझन्स आपापल्या पद्धतीने या ट्विटचा अर्थ काढू लागले आहेत.
advertisement
अमिताभ बच्चन यांनी पहिलं ट्वीट 6 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10:01 वाजता केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे,"आते हैं". यावर नेटकऱ्यांनी काय झालं? आम्ही वाट पाहतोय, हे तुम्ही 52 वर्षांपूर्वीदेखील म्हणाला होतात, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. एका नेटकऱ्याने तर थेट "रेखा जींच्या घरी जाताय का?", असं विचारलं आहे.
advertisement
advertisement
अमिताभ बच्चन यांनी तिसरं ट्वीट 6 डिसेंबर 2025 रोजी 1.22 ला केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे,"सालों साल पहले भी हुआ था, निष्कल रहा, अब्भी यही होगा!!! निष्फल". या ट्वीटवर म्हणायचं काय आहे तुम्हाला?, जयाजींना समजावण्याचा प्रयत्न, तुमच्या या ट्वीटचा नक्की अर्थ काय? अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
advertisement
advertisement


