Rohit Sharma : रोहित शर्माचं शतक हुकलं, पण... हिटमॅनने 25 वी रन काढताच स्टेडियम उभं राहिलं!

Last Updated:

रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे, याचसोबत त्याने सचिन तेंडुलकरच्या क्बलमध्ये एन्ट्री घेतली आहे.

रोहित शर्माचं शतक हुकलं, पण... हिटमॅनने 25 वी रन काढताच स्टेडियम उभं राहिलं!
रोहित शर्माचं शतक हुकलं, पण... हिटमॅनने 25 वी रन काढताच स्टेडियम उभं राहिलं!
विशाखापट्टणम : रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार रन पूर्ण केले आहेत. हा विक्रम करणारा रोहित भारताचा चौथा खेळाडू बनला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि राहुल द्रविड यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार रनचा टप्पा गाठला होता.
रोहित शर्माने विशाखापट्टणममधल्या तिसऱ्या वनडेमध्ये 25 रन करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार रन पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर केशव महाराजच्या बॉलवर एक रन काढून रोहितने हा विक्रम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक 34,357 रन आहेत. तर विराटने 27,910 आणि राहुल द्रविडने 24,208 रन केले आहेत.

14 वा खेळाडू बनला रोहित

advertisement
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार रन करणारा जगातला 14 वा खेळाडू बनला आहे. रोहितने 505 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 20 हजार रन पूर्ण केले. रोहितने भारताकडून 67 टेस्ट, 279 वनडे आणि 159 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत.

रोहितची 35 वी शतकी पार्टनरशीप

37 वर्षांच्या रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही अर्धशतक केलं होतं. तर तिसऱ्या सामन्यात त्याने यशस्वी जयस्वालसोबत 155 रनची पार्टनरशीप केली. 73 बॉलमध्ये 75 रन करून रोहित आऊट झाला. रोहितची वनडे क्रिकेटमधली ही 35 वी शतकी पार्टनरशीप होती. रोहितआधी सचिन तेंडुलकरने 40 वेळा असा कारनामा केला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : रोहित शर्माचं शतक हुकलं, पण... हिटमॅनने 25 वी रन काढताच स्टेडियम उभं राहिलं!
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement