रील ते रिअल, 90s चं हिट मराठी कपल, आता पहिल्यांदाच मालिकेतही एकत्र
- Published by:Minal Gurav
Last Updated:
90 च्या दशकात मराठी सिनेसृष्टी गाजवणारं हिट कपल आता पहिल्यांदाच मराठी मालिकेतही एकत्र दिसणार आहेत. दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
advertisement
advertisement
अशोक सराफ आणि निवेदिता यांनी त्यांच्या हसऱ्या केमिस्ट्रीपासून ते भावनिक प्रसंगांपर्यं प्रत्येक वेळेस हृदयाला भिडणारे क्षण प्रेक्षाकंना दिले आहेत. त्यांचं हे सुंदर नातं पुन्हा एकदा 'अशोक मा.मा.' या मालिकेमधून छोट्या पडद्यावर खुलणार आहे. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ पहिल्यांदाच एकत्र एकाच मालिकेत दिसणार आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
"माझे सर्वात आनंदाचे दिवस असतात जेव्हा मी त्यांच्यासोबत काम करते. खूपकाही शिकायला मिळतं. बऱ्याच वर्षांनी संधी मिळाली आहे मला हि, आता लवकरच अशोक मा.मा. या मालिकेत माझी एंट्री होणार आहे. यामधील खास गोष्ट म्हणजे छोट्या पडद्यावर आमची जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. मी खूप उत्सुक आहे, खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल."


