Dada Kondke : दादा कोंडकेंनी 16 सिनेमांची निर्मिती केली, सगळे सुपरहिट; सिल्व्हर ज्युबली सिनेमांचं रहस्य काय?

Last Updated:
सत्तरच्या दशकात मराठी सिनेसृष्टीत तमाशापटांचा काळ होता. हा काळ संपल्यानंतर सिनेसृष्टीत विनोद सिनेमांची लाट आली होती. त्यात लक्ष वेधून घेणारे एकमेव अभिनेते होते ते म्हणजे दादा कोंडके. गुडघ्यापर्यंत चड्डी, लोंबणारी नाडी, त्यावर हाफ हाताचा कुर्ता, केसांचा पैलवान कट, बारीक मिशी अशा भन्नाट अवतारातील प्रमुख नायक या काळात प्रेक्षकांसमोर आला आणि प्रेक्षकांनी या नायकाला जसाच्या तसं स्वीकारलं.
1/8
संवाद म्हणण्याची लकब आणि त्यात सहजपणे विनोदी फटकेबाजी म्हणजे दादांचा सिनेमा. त्याही पुढे जाऊन दादा कोंडके यांचा सिनेमा कधीच शिळा होत नाही. आजही दादांचे सिनेमे तितक्यात आवडीनं पाहिले जातात. दादांचे सिनेमे थिएटरमध्ये लागणार म्हणजे पार बॉलिवूडपर्यंत अगदी राज कपूर यांच्याही पोटात गोळा यायचा. अशा या दादा कोंडके यांची 91वी जयंती आहे.

advertisement
2/8
दादा कोंडके यांनी मराठी सिनेमाला सोन्याचे दिवस आणले. सिनेमाला थिएटर मिळावं म्हणून खूप संघर्ष केला. पार बॉलिवूडच्या मोठ्या निर्मात्या आणि कलाकारांनी दादांना धमक्या दिल्या मात्र दादांचे सिनेमे एकदा का थिएटरवर गेले की पुढचे 25 आठवडे खाली उतरण्याचं नाव घेत नव्हते. दादा कोंडके यांचे सिनेमे इतके हिट होण्यामागचं नेमकं काय कारण होतं? याचा कधी विचार केलाय? पाहूयात यामागची कारणं. ( फोटो : उषा चव्हाण यांच्या सोशल मीडियावरून साभार )

3/8
दादांनी करमणूकप्रधान, ठसकेबाज आणि सुमधूर गाणी, भोळाभाबडा नायक असलेले सिनेमे तयार करून प्रेक्षक वर्ग आपल्याकडे खेचून आणला. दादा कोंडके यांचा सिनेमा म्हणजे विनोदाचे अजब रसायन. सिनेमाची कथा, संवाद, दिग्दर्शन, गाण्यांची निवड या सगळ्यात दादांचा हात कुणीच धरू शकत नाही. त्या काळात सेक्युअल कॉमेडी असलेली म्हणजे कंबरेखालील विनोद असलेले सिनेमे आणण्याचं धाडस एकट्या दादा कोंडके यांनी केलं. ( फोटो : उषा चव्हाण यांच्या सोशल मीडियावरून साभार )

4/8
दादांच्या सिनेमाची कथा तर हिट व्हायचीच पण त्यांच्या सिनेमातील नायकाच्या रूपातील दादांचा तोरा , गाणी, संवाद यामुळे दादांचा सिनेमा किमान 25 आठवडे तरी थिएटरवर झळकलेला असायचा. ( फोटो : उषा चव्हाण यांच्या सोशल मीडियावरून साभार )

5/8
दादांनी त्यांच्या कारकीर्दीत 16 सिनेमांची निर्मिती केली आणि ते सगळे सिनेमे रौप्यमहोत्सवी ठरले. दादा कोंडके यांचा नवा सिनेमा प्रदर्शित झाला की तो सिल्वर ज्युबिली साजरी करूनच पोस्टर खाली उतरणार हे समीकरणच होतं. त्यामुळे दादांचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. ( फोटो : उषा चव्हाण यांच्या सोशल मीडियावरून साभार )

6/8
त्यातूनच दादांच्या सिनेमांना ज्युबिलीस्टार सिनेमा अशी ओळख मिळाली. दादांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले आणि अलगद रडवलेही. विनोदी सिनेमांनाही कारूण्याची किनार कशी द्यायची याची नस दादांना सापडली होती. ( फोटो : उषा चव्हाण यांच्या सोशल मीडियावरून साभार )

7/8
दादांच्या सिनेमाचा नायक ते स्वत: असायचा. त्यांनी साकारलेला रांगडा नायक प्रेक्षकांनीही स्वीकारला होता. त्यांची संवाद म्हणण्याची लकब आणि त्यात सहजपणे विनोदी फटकेबाजी प्रेक्षकांना भावून जायची. ( फोटो : उषा चव्हाण यांच्या सोशल मीडियावरून साभार )

8/8
‘सासरचं धोतर’, ‘राम राम गंगाराम’, ‘ह्योच नवरा पाहिजे’, 'येऊ का घरात', 'बोट लावेन तिथे गुदगुल्या', 'सोंगाड्या', 'आली अंगावर' सारखे एकना अनेक सिनेमांनी दादांनी मराठी सिनेसृष्टी दणाणूक सोडली. ( फोटो : उषा चव्हाण यांच्या सोशल मीडियावरून साभार )

Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement