'कांतारा चॅप्टर 1' बनला 2025चा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा, मोडला मराठी दिग्दर्शकाच्या सिनेमाचा रेकॉर्ड

Last Updated:
Highest Grossing Indian Film Of 2025: या वर्षी 14 फेब्रुवारी विकी कौशलचा 'छावा' हा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा 2025 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी ठरला. छावाचा रेकॉर्ड कोण मोडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं अखेर छावाचा रेकॉर्ड मोडला. छावाचा रेकॉर्ड मोडणारा सिनेमा आता ओटीटीवरही धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. 
1/7
2025 मध्ये थिएटरमझ्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या छावा सिनेमाचा रेकॉर्ड 
2025 मध्ये थिएटरमझ्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या छावा सिनेमाचा रेकॉर्ड  "कांतारा: चॅप्टर 1"  ने मोडला आहे. कांताराने जगभरात किती कमाई केली आहे पाहूयात.  
advertisement
2/7
विक्की कौशलचा छावा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाला. प्रेक्षकांचं त्याला प्रेम मिळालं. छावा सिनेमाची सर्वाधिक कमाई ही महाराष्ट्रातून झाली.  छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवन प्रवास दाखवणारा हा सिनेमा एक दमदार ऐतिहासिक अ‍ॅक्शन सिनेमा ठरला. 

3/7
शिवाजी सावंत यांच्या छावा या मराठी कादंबरीवर हा सिनेमात आधारित होता. लक्ष्मण उतेरकर या मराठमोळ्या दिग्दर्शकानं हा सिनेमा बनवला.   रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना देखील या सिनेमात महत्त्वाच्या भुमिकेत आहेत. 

4/7
IMDB नुसार, छावा हा सिनेमा 150 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 808.7 कोटींची कमाई केली.  2025 च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीत हा सिनेमा पहिल्या क्रमांकावर होता पण आता हा रेकॉर्ड कांतारा 2 च्या नावे झाला आहे. 

5/7
ऋषभ शेट्टीच्या कांतारा 2ने छावाला मागे टाकलं आहे. सिनेमाने जगभरात 840.2 कोटींची कमाई केली आहे. कांतारा हा  2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत पहिला आहे.  

6/7
कांतारा चॅप्टर 1 हा हा कन्नड भाषेतील एक महाकाव्य पौराणिक अ‍ॅक्शन सिनेमा आहे. हा सिनेमा हिंदीतही आहे. नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर सिनेमा रिलीज झाला असून हा सिनेमा Netflix वर टॉप ट्रेंड बनला आहे.

7/7
ऋषभ शेट्टी केवळ सिनेमात अभिनेता नाही तर त्याने त्याचे लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. हा सिनेमा विजय किरागंदूर आणि चालुवे गौडा यांनी होम्बाले फिल्म्स अंतर्गत तयार केला आहे. या सिनेमात ऋषभ शेट्टीबरोबरच जयराम, रुक्मिणी वसंत आणि गुलशन देवैया हे कलाकार देखील आहेत. हा सिनेमा 2022मधील  'कंतारा' चित्रपटाचा प्रीक्वल आहे. 

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement