Madhuri Dixit : लग्नाच्या 10 वर्षांनी माधुरी दीक्षित भारतात का परतली? 'धक-धक गर्ल'ने 14 वर्षांनी सांगितलं कारण
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Madhuri Dixit : माधुरी दीक्षित डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर अमेरिकाला गेली होती. पण लग्नाच्या 10 वर्षांनी तिने अमेरिका सोडलं आणि भारतात परतली. आता 14 वर्षांनी 'धक-धक गर्ल'ने अमेरिका सोडून भारतात येण्याचं कारण सांगितलं आहे.
बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' अर्थात माधुरी दीक्षितचे लाखो चाहते आहेत. 90 च्या दशकात माधुरीने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांना वेड लावलं होतं. करिअर पीकवर असताना माधुरी दीक्षित 1999 मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली. लग्नानंतर माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांनी अमेरिकेत सेटल होण्याचा निर्णय घेतला होता.
advertisement
advertisement
माधुरी दीक्षितने नुकतीच रणवीर अल्लाहबादियाच्या युट्यूबवरील 'द रणवीर शो' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी माधुरीने भारतात परतण्याचं कारण सांगितलं. माधुरी दीक्षित म्हणाली,"USA मधील आयुष्य खूप अद्भुत आणि शांतिपूर्ण होतं. अमेरिकेत मी स्वप्नवत आयुष्य जगत होती. मुलं सोबत असल्याने त्यांच्यासोबत खूप छान वेळ घालवता आला".
advertisement
माधुरी दीक्षित म्हणाली,"मुलांना बागेत घेऊन जाणं, त्यांच्यासोबत खेळणं. माझे आई-वडिलदेखील माझ्यासोबत राहत होते. भाऊ आणि बहीणदेखील अमेरिकेत राहत होते. डॉ. श्रीराम नेणे यांचे कुटुंबियदेखील तिथेच राहत होते. पण आई-वडिलांचं वय वाढत असल्याने त्यांची भारतात येण्याची इच्छा होती. माझ्या संपूर्ण आयुष्यात आणि करिअरमध्ये आई-वडिल माझ्यासोबत होते. त्यामुळे मला त्यांना सोडायचं नव्हतं".
advertisement
advertisement
advertisement


