वयाच्या 52 व्या वर्षी महिमा चौधरीने संजय मिश्रासोबत गुपचूप उरकलं लग्न? वरमाळा घालतानाचे PHOTO समोर
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Mahima Chaudhary Sanjay Mishra Wedding : महिमा चौधरी आणि संजय मिश्रा यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये महिमा चौधरी आणि संजय मिश्रा एकमेकांना वरमाळा घालताना दिसत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
महिमा चौधरी आणि संजय मिश्रा यांचा आगामी 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी' हा चित्रपट येत्या 19 डिसेंबर 2025 रोजी रिलीज होणार आहे.'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी'च्या ट्रेलरमध्ये दाखवले आहे की आपल्या मुलाचे लग्न लावून देण्यासाठी दुर्लभ प्रसाद (संजय मिश्रा) स्वतःच पुन्हा लग्न करण्यास तयार होतात, कारण मुलीच्या कुटुंबाची अट असते की घरात एखादी स्त्री असेपर्यंतच ते मुलीचे लग्न करतील. दरम्यान दुर्लभ प्रसाद यांच्या आयुष्यात महिमा चौधरीची एन्ट्री होते. महिमा चौधरी सिगारेटपासून दारू पर्यंत सर्व काही पिते. दोघांच्या आयुष्यात एक मोठा ट्विस्टही येत असल्याचे पाहायला मिळते.
advertisement
संजय मिश्रा आपल्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाले,"दुर्लभ प्रसाद' हे असं पात्र आहे, जे त्याच्या साधेपणामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील. भावना आणि कॉमेडी यांचा संगम नेहमीच खास असतो आणि या चित्रपटात या दोन्हींचे उत्तम मिश्रण आहे. या अनोख्या वराशी आणि त्याच्या तेवढ्याच अनोख्या प्रवासाशी प्रेक्षकांची ओळख करून देण्यासाठी मी उत्सुक आहे".
advertisement


