आता घरबसल्या पाहा Dhurandhar चा धमका, समोर आली OTT रिलीजबद्दल मोठी अपडेट, कधी आणि कुठे पाहता येणार?

Last Updated:
Dhurandhar OTT Release Date: जे लोक थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहू शकले नाहीत, त्यांच्यासाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या ब्लॉकबस्टर सिनेमाच्या OTT रिलीजची अधिकृत माहिती आणि तारखा समोर आल्या आहेत!
1/10
मुंबई: बॉक्स ऑफिसवर सध्या फक्त एकाच नावाचा डंका वाजतोय आणि ते नाव म्हणजे 'धुरंधर'! रणवीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्त यांच्या दमदार अभिनयामुळे हिट ठरलेला हा सिनेमा चित्रपटगृहात अक्षरशः धुमाकूळ घालतोय.

advertisement
2/10
पण, जे लोक थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहू शकले नाहीत, त्यांच्यासाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या ब्लॉकबस्टर सिनेमाच्या OTT रिलीजची अधिकृत माहिती आणि तारखा समोर आल्या आहेत!

3/10
चित्रपटगृहात 'धुरंधर'ची घोडदौड थांबायचं नाव घेत नाहीये. पहिल्याच दिवशी २८ कोटींची ओपनिंग करणाऱ्या या सिनेमाने दुसऱ्या आठवड्यात तर पहिल्या आठवड्यापेक्षाही जास्त गल्ला जमवला आहे.

4/10
दुसऱ्या रविवारी तब्बल ५८ कोटींची कमाई करून या चित्रपटाने नवा इतिहास रचला आहे. अवघ्या १२ दिवसांत भारतामध्ये ४११ कोटी आणि जगभरात ५०० कोटींचा टप्पा पार करणारा हा आदित्य धरचा स्पाय-थ्रिलर आता लवकरच तुमच्या मोबाईल स्क्रीनवर धडकणार आहे.

5/10
घरात बसून आरामात सिनेमा पाहू इच्छिणाऱ्या प्रेक्षकांसाठी 'नेटफ्लिक्स'ने कंबर कसली आहे. रिपोर्ट्सनुसार, नेटफ्लिक्सने १३० कोटी रुपयांना या चित्रपटाचे डिजिटल हक्क खरेदी केले आहेत.

6/10
रणवीर सिंगच्या आजवरच्या करिअरमधील ही सर्वात महागडी ओटीटी डील ठरली आहे. निर्मात्यांनी इतक्या मोठ्या रकमेत व्यवहार केल्यामुळे या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

7/10
जर तुम्ही 'धुरंधर'च्या घरबसल्या प्रदर्शनाची वाट पाहत असाल, तर तुम्हाला नवीन वर्षाची वाट पाहावी लागेल. 'जीक्यू इंडिया'च्या ताज्या वृत्तानुसार, 'धुरंधर' ३० जानेवारी २०२६ पर्यंत नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल होण्याची शक्यता आहे.

8/10
हा चित्रपट ३ तासांहून अधिक लांबीचा असून, ओटीटीवर त्याचे सर्व थरारक ॲक्शन सीक्वेन्स हाय-डेफिनिशन क्वालिटीमध्ये पाहायला मिळतील. तथापि, अद्याप निर्मात्यांनी किंवा नेटफ्लिक्सने अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी ३० जानेवारीच्या आसपास हा सिनेमा स्ट्रीम होण्याची दाट शक्यता आहे.

9/10
हा चित्रपट केवळ मारामारीपुरता मर्यादित नाही. पाकिस्तानच्या 'लियारी' भागात शिरून भारतीय गुप्तहेर ज्या पद्धतीने रहमान डकैतच्या गँगचा खात्मा करतात, तो थरार अंगावर शहारे आणणारा आहे.

10/10
कथानकातील वळणे आणि अक्षय खन्नाची शांत पण क्रूर खलनायकी भूमिका हे या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण आहे. त्यामुळे, जर तुम्ही अद्याप थिएटरमध्ये हा धमाका अनुभवला नसेल, तर जानेवारीअखेर नेटफ्लिक्सवर हा अनुभव घेण्यासाठी तयार राहा.

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement