'प्रत्येक 2 मिनिटांनी OTP...' RJ महावशचं अकाऊंट हॅक, इन्स्टा स्टोरी ठेवून हॅकर्सचीच लावली वाट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
RJ Mahvash : लोकप्रिय इन्फ्लुएन्सर आणि आरजे महवश हिचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न झाला. तिने हॅकरला जबरदस्त उत्तर दिलं.
advertisement
advertisement
महवशने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती हॅकरला उद्देशून म्हणाली, "जो कोणी माझं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याने तो प्रयत्न थांबवावा. आम्ही मेटा टीमच्या मदतीने ते परत मिळवू. पण बाबा, दर दोन मिनिटांनी ओटीपी पाठवू नकोस. माझ्या छोले-भटुरेंची ऑर्डर येणार आहे, आणि या ओटीपीमुळे गोंधळ होतोय."
advertisement
advertisement
advertisement