1 तास 33 मिनिटांचा थरार, 10 निर्दयी हत्या, बाप-लेकीची डोकं सुन्न करणारी स्टोरी, तुम्ही पाहिलीये ही डॉक्युमेन्ट्री
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Netflix Crime Documentary : काही मुलांसाठी आपल्या आई-वडिलांना पूर्णपणे समजून घेणं सोपं नसतं. अशीच एक मुलगी आहे, जिने अनेक वर्षांनी आपल्या बालपणातील त्या भयावह काळाची आठवण सांगितली, जेव्हा ती आपल्या वडिलांच्या खूप जवळ होती. पण जेव्हा तिला आपल्या वडिलांचा भयानक खरा चेहरा समजला, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली आणि ती आपल्या कुटुंबापासून कायमची दूर झाली.
1. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे क्षण येतात, जेव्हा त्याला आपल्या कुटुंबाची किंवा समाजाची प्रतिमा आणि वास्तव यातला फरक कळायला लागतो. हे बदल कधी हळूहळू येतात, तर कधी इतका मोठा धक्का देतात की आयुष्यभर ते विसरता येत नाहीत. असाच एखादा धक्का संपूर्ण आयुष्यचं बदलून टाकतो आणि संपूर्ण जग हादरून जातं. नेटफ्लिक्सवरील अशीच एका बाप-मुलीच्या थरारक कहाणीची डॉक्युमेंट्री पाहून तुमचं डोकं सुन्न होईल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'My Father the BTK Killer' ही वेबसीरिज केरी रॉसन यांच्या पुस्तकावर आधारित आहे. एका मुलीने आपल्या वडिलांचे गुन्हे, मानसिक त्रास आणि वेदनांशी झगडत आपले जीवन कसं सावरलं. जेव्हा तिच्या वडिलांनी या सगळ्या हत्या केल्या, तेव्हा डेनिस रेडर फक्त पाच वर्षांची होती आणि ती आपल्या वडिलांना आपला आदर्श मानत होती. पण सत्य हे होतं की तिचे वडील म्हणजेच अमेरिकेतील सर्वात भयानक सीरियल किलर होते.