Kacha Badam Singer : ज्या गाण्यामुळे मिळाली प्रसिद्धी ते गाणंच गेलं चोरीने, कच्चा बादाम फेम भूबनसोबत मोठा गफला; नेमकं प्रकरण काय?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Kacha Badam Singer Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' या सुपरहिट गाण्याचे गायक भुबन बड्याकर यांचा संघर्षमय प्रवास राहिला आहे. 'कच्चा बादाम'ने त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली असली तरी या गाण्याचे हक्क मात्र त्यांच्याकडून काढून घेण्यात आले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
एका व्यक्तीने भूबन बड्याकर यांचं गाणं रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकलं आणि काही दिवसांतच ते इतकं व्हायरल झालं की भुबन बड्याकर हे नाव प्रत्येकाच्या ओठांवर होतं. बंगालच्या गल्ल्यांतील झोपडीत राहणारा भूबनच्या आवाजाने बॉलिवूडलाही भूरळ पाडली. आज ते झोपडीत राहत नाहीत तर स्वत:च्या हक्काच्या घरात राहतात.
advertisement
'कच्चा बादाम'ने आर्थिक फायदा झाला का याबाबत प्रामाणिकपणे बोलताना भूबन बड्याकर म्हणाले,"मुंबईत 60-70 हजार, कोलकोत्यामध्ये एक लाख मिळाले. पण आता या गाण्याचा कॉपीराइट माझ्याकडे नाही". त्यांनी सांगितले की काही लोक मोठमोठ्या वचनांसह आले, त्यांनी काही कागदांवर सह्या करून घेतल्या आणि 'कच्चा बादाम' चे हक्क स्वतःकडे घेतले. त्यामुळे या गाण्याने मला प्रसिद्धी पण दिली आणि फसवलंदेखील".
advertisement
advertisement