तिकीट बुक होता होईना, IRCTC वेबसाइट आणि App अचानक बंद, प्रवाशांना मनस्ताप

Last Updated:

दिवाळीच्या तोंडावर IRCTC वेबसाईट क्रॅश झाली, लाखो प्रवासी तिकीट बुकिंगसाठी मनस्ताप सहन करत आहेत. सोशल मीडियावर नाराजी, इंजिनियर्स समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारतीय रेल्वे
भारतीय रेल्वे
आधीच वेटिंग तिकीटामुळे वैतागलेले प्रवासी आता तात्काळ तिकीट बुकिंगसाठी प्रयत्न करत आहेत. दिवाळी निमित्ताने गावी जाण्यासाठी बस दुप्पट भाडं घेत असल्याने ट्रेननं प्रवास करण्यासाठी गर्दी करत आहेत. तात्काळ तिकीटासाठी बुकिंग करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते बुक होत नाही. याचं कारण म्हणजे वेबसाइट काही वेळासाठी बंद झाली होती. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
जर तुम्ही धनत्रयोदशी किंवा दिवाळीच्या मुहूर्तावर घरी जाण्यासाठी रेल्वे तिकीट बुक करत असाल, तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. दिवाळीच्या अगदी तोंडावर, आज इंडियन रेल्वेच्या तिकीट बुकिंग वेबसाईट IRCTC मध्ये मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली. यामुळे वेबसाईट आणि मोबाईल ॲप दोन्ही व्यवस्थित काम करत नव्हते, परिणामी लाखो प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुकिंग करताना प्रचंड मनस्ताप झाला.
advertisement
तत्काळ बुकिंगच्या वेळी वेबसाईट क्रॅश
नेमकी ही तांत्रिक अडचण अशा वेळी आली, जेव्हा हजारो प्रवासी तत्काळ कोट्यांतर्गत तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, अचानक जास्त संख्येने युजर्स बुकिंग करू लागल्यामुळे वेबसाईट क्रॅश झाली. दिवाळीच्या काळात लाखो लोक आपल्या गावी जाण्यासाठी तिकीट बुकिंग करतात. अशा महत्त्वाच्या वेळी इंडियन रेल्वेची साईट ठप्प पडल्याने प्रवाशांसाठी एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.
advertisement
प्रवाशांनी सोशल मीडियावर व्यक्त केली नाराजी
IRCTC च्या अधिकाऱ्यांनी या तांत्रिक बिघाडाची कबुली दिली असून, इंजिनियर्सची टीम ती समस्या लवकरच दूर करण्यासाठी काम करत असल्याचे सांगितले. मात्र, अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर 'साईट डाऊन' आणि 'एरर' मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. काही प्रवाशांनी तक्रार केली की, वेबसाईट पुन्हा सुरू होईपर्यंत कमी वेळेत पोहोचणाऱ्या महत्त्वाच्या गाड्यांमधील सीट्स फुल्ल झाल्या होत्या.
advertisement
काय आहे प्रवाशांसाठी पर्याय?
IRCTC ची साईट सणासुदीच्या काळात ठप्प होण्याची ही काही पहिली वेळ नाही. दरवर्षी तत्काळ बुकिंग सुरू होताच, मोठ्या ट्रॅफिकमुळे वेबसाईट किंवा ॲप मंदावते किंवा बंद पडते. जोपर्यंत ऑनलाईन सेवा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी रेल्वे आरक्षण काउंटरवर जाऊन तिकीट काढावं लागेल किंवा ट्रॅव्हल एजंटची मदत घ्यावी लागेल. मात्र तेही मनस्ताप देणारंच आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
तिकीट बुक होता होईना, IRCTC वेबसाइट आणि App अचानक बंद, प्रवाशांना मनस्ताप
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement